जाहिरात

अरेरेरे..घाईघाईत फटाके फोडताय? हात भाजल्यावर काय कराल? Diwali च्या 'या' सेफ्टी टीप्स अजिबात विसरू नका

Diwali Safety Tips : दिवाळी सण म्हटलं की सगळीकडे प्रकाशाची झगमगाट अन् आनंदाचं वातावरण..दिवाळीत रांगोळ्या, आकाशकंदील पेटवणे, किल्ले बांधणे या गोष्टी तर होतच असतात. पण दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करायला सर्वांनाच आवडतं.

अरेरेरे..घाईघाईत फटाके फोडताय? हात भाजल्यावर काय कराल? Diwali च्या 'या' सेफ्टी टीप्स अजिबात विसरू नका
Diwali Festival 2025 latest Update
मुंबई:

Diwali Safety Tips : दिवाळी सण म्हटलं की सगळीकडे प्रकाशाची झगमगाट अन् आनंदाचं वातावरण..दिवाळीत रांगोळ्या, आकाशकंदील पेटवणे, किल्ले बांधणे या गोष्टी तर होतच असतात. पण दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करायला सर्वांनाच आवडतं. दिवाळीत फटाके फोडल्यानंतर लहान मुलांपासून मोठ्या माणसांना एक वेगळाच आनंद मिळतो. दिवाळीत फटाके फोडण्याची तर मज्जाच असते, पण फटाके फोडताना जर चूक केली, तर अंगावर जाळ निघल्याशिवाय राहत नाही. फटाके फोडताना शरीर भाजलं..तर या गोष्टी तातडीनं करायला अजिबात विसरू नका..

दिवाळीत हात भाजल्यावर काय कराल? 

1) थंड पाणी

शरीराचं जे भाग जळलं आहे, ते थंड पाण्याच्या खाली ठेवा. कमीत कमी 10-15 मिनिटांपर्यंत असं करत राहा.यामुळे शरीराला वेदना कमी होतील आणि फोड येण्याचा धोकाही कमी होतो. पण बर्फाचं पाणी किंवा बर्फ भाजलेल्या जागेवर लगेच लावू नका. यामुळे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकतो.

2) कपडे आणि दागिने लगेच काढून टाका

जर जळलेल्या शरीराच्या भागावर एखादी अंगठी, बांगड्या किंवा टाईट कपडा असेल, तर ते लगेच काढून टाका.शरीर जळाल्यानंतर सूज येऊ शकते. यामुळे शरीराला जखम किंवा वेदना होऊ शकतात. 

नक्की वाचा >> खुशखबर! सर्वांचा फेव्हरेट 'हा' iphone झाला 45 हजारांनी स्वस्त, बंपर सेलमध्ये एकदाच आपटले भाव

3) जळलेल्या भागाला खाजवू नका

फटाके फोडल्यानंतर शरीराच्या ज्या भागाला भाजलं असेल, त्या जागेवर हातने खाजवू नका. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो आणि त्वचा रोगही होण्याची शक्यता असते. त्वचेची जखम मोठी होऊ शकते.

काय करू नका?

1) टूथपेस्ट किंवा हळद लावू नका

हे घरगुती उपाय अनेकदा शरीरासाठी घातक ठरू शकतात. यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते.यामध्ये असे तत्व असतात, ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्वचा खराब होऊ शकते.

नक्की वाचा >> हरणाचा वेग पाहून चित्त्यालाही घाम फुटला..हवेत एकच झडप अन् खेळ खल्लास..शेवटी कोण जिंकलं? थक्क करणारा Video

2) थेट बर्फ लावू नका

फटाके फोडल्यानंतर शरीराच्या ज्या भागात जळलं असेल, त्या ठिकाणी लगेच बर्फ लावू नका. त्यामुळे फ्रोस्टबाईटचा (frostbite)  धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्वचेचं आणखी नुकसान होऊ शकतं. तसच त्वचेवर फोड आल्यास ते फोडू नका. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं.

First Aid नंतर काय करू नका?

थंड पाण्याने दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही शरीराचं जळलेल्या भागावर एंटीसेप्टिक क्रीम लावू शकता. जसं की सिल्व्हर सल्फेडियाजीन (Silver Sulfadiazine) क्रीम, सामान्यपणे ही क्रीम जळलेल्या भागावर लावतात. जळलेलं भाग एखाद्या साफ कपड्याने किंवा पट्टीने झाकून ठेवा. जेणेकरून त्वचेला इन्फेक्शन होणार नाही. पट्टी खूप टाईट बांधा. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com