Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या बहुतेक लोकांना त्यांचे पैसे दीर्घकाळात अनेक पटींनी वाढावेत असं वाटत असतं. जर तुमच्याकडे २५ लाख रुपयांची रक्कम असेल, तर भविष्यात ती २ कोटी रुपये होऊ शकते का? याचे अचूक उत्तर वेळ आणि परताव्यावर अवलंबून असतं. म्युच्युअल फंडातील चक्रवाढीच्या शक्तीचा दीर्घकाळात महत्त्वपूर्ण परिणाम होतो. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, म्युच्युअल फंडाचा परतावा निश्चित नसतो आणि बाजारातील चढ-उताराचा तुमच्या पैशांवर परिणाम होऊ शकतो.
किती वर्षे लागतील?
उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही २५ लाख रुपये एकत्रित इक्विटी म्युच्यूयल फंडात गुंतवले असतील तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला १२ टक्क्यांचा रिलर्ट मिळतो. अशात तुम्ही १८ वर्षात २ कोटी मिळू शकतात. म्हणजे २५ लाख रुपये ८ पट करण्यासाठी बराच काळासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
वेगवेगळ्या परताव्यासाठी किती वेळ लागेल?
१. जर तुम्हाला १०% वार्षिक रिटर्न मिळाले, तर २५ लाख रुपयांचे २ कोटी रुपये होण्यासाठी अंदाजे २२ वर्षे लागतील.
२. जर तुम्हाला १२% वार्षिक रिटर्न मिळाले तर तुम्ही अंदाजे १८ वर्षांत २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकता.
३. जर तुम्हाला १५% वार्षिक परतावा मिळाला, तर २५ लाख रुपयांचे २ कोटी रुपये होण्यासाठी अंदाजे १५ वर्षे लागतील.
कंम्पाउडिंग वाढविण्यास कशी मदत करते?
म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंम्पाउडिंग. यामुळे तुम्हाला केवळ तुम्ही गुंतवलेल्या पैशांवरच नव्हे, तर तुम्ही आधीच मिळवलेल्या परताव्यावरही परतावा मिळतो. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पैसे हळूहळू वाढत असले तरी, जसजसा वेळ जातो, तसतसा परताव्यावरील परतावा तुमची संपत्ती वेगाने वाढवू लागतो.