NDTV Q4 Results: एनडीटीव्हीच्या महसुलात 59 टक्क्यांची वाढ, डिजिटल ट्रॅफिकमध्ये 39% ची वृद्धी

NDTV ने एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये NDTV ची नवी वाहिनी अर्थात एनडीटीव्ही मराठी 1 मे पासून प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होत असल्याचे सांगितले आहे. या वाहिनीच्या पदार्पणानंतर एनडीटीव्हीच्या वाहिन्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 2 वरून 6 होणार आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

NDTV Ltd. ने चौथ्या तिमाहीचा  (Q4FY24) निकाल जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीच्या महसुलात 59 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. इतकंच नाही तर कंपनीच्या डिजिटल ट्रॅफिकमध्ये 39% वाढ दिसून आली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिमाही निकालासोबतच एनडीटीव्हीने एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये NDTV ची नवी वाहिनी अर्थात एनडीटीव्ही मराठी 1 मे पासून प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होत असल्याचे सांगितले आहे. या वाहिनीच्या पदार्पणानंतर एनडीटीव्हीच्या वाहिन्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 2 वरून 6 होणार आहे.  याव्यतिरिक्त NDTV ने NDTV Profit नावाची अर्थविषय वाहिनी रि-लॉन्च केली आहे.

(नक्की वाचा- मारुती सुझुकीचा विक्रीचा नवा विक्रम, वर्षभरात 20 लाख वाहनांची विक्री)

NDTV ने एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की समूहाने यावर्षी आपले लक्ष्य गुंतवणूक वाढवणे आणि नव्या वाहिन्या लाँच करणे हे ठेवले होते. यासोबतच कंपनीने आपल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावरही भर दिला आहे. याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर दिसून येत आहे.  एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या माहितीनुसार NDTV च्या अॅट्रीशन दरातही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 58% कमी झाला आहे.

Topics mentioned in this article