
GST Car Price Change : यंदाच्या जीएसटी कौन्सिल बैठकीत (GST Council Meet) मोठी क्रांती झाली आहे. सरकारने अनेक रोजच्या वापरातील वस्तूंपासून, हेल्थकेअर, वाहनांवरील जीएसटी दरात मोठी कपात केली आहे. सरकारने 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करून, त्याऐवजी 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदात मोठी भर पडली आहे.
जीएसटी कौन्सिल बैठकीत कार खरेदीतील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर केल्यामुळे नागरिकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. नवरात्रौत्सवापासून हे नवे दर लागू होणार आहेत. कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर नवरात्रौत्सव हा लक्ष्मी वाचवणारा असा चांगला मुहूर्त ठरू शकेल. (car price drops)
नक्की वाचा - GST : दारुवर किती टॅक्स? सिगारेट-तंबाखूपासून कोल्ड्रिंक्स चाहत्यांना मोठा झटका, GST चा खिशावर काय परिणाम होईल?
कोणत्या कंपनीच्या कार स्वस्त होणार? पाहा यादी l Which company's cars will be cheaper
छोट्या कार
मारुतीची अल्टो कार
सध्याची किंमत - 4.2 लाख
किती वाचतील - 35.7 हजार
मारुतीची वॅगनआर
सध्याची किंमत - 5.7 लाख
किती वाचतील - 90 हजार
मारुतीची स्विफ्ट
सध्याची किंमत - 6.5 लाख
किती वाचतील - 1 लाख
ह्युंदाईची आय10निओ
सध्याची किंमत - 6 लाख
किती वाचतील - 51 हजार
सेडान
मारुतीची डिझायर
सध्याची किंमत - 6.8 लाख
किती वाचतील - 1 लाख
व्हीडब्ल्यू व्हर्टस
सध्याची किंमत - 6.8 लाख
किती वाचतील - 1 लाख
एन्ट्री एसयूव्ही
टाटा पंच
सध्याची किंमत - 6.2 लाख
किती वाचतील - 90 हजार
प्रीमियम एसयूव्ही - SUV price drops
मारुती ब्रिझा
सध्याची किंमत - 8.7 लाख
किती वाचतील - 90 हजार
ह्युंदाई क्रेटा
सध्याची किंमत - 11.1 लाख
किती वाचतील - 1.1 लाख
एमअॅडएम एक्सयूव्ही 700
सध्याची किंमत - 14.5 लाख
किती वाचतील - 1.9 लाख
एमपीव्ही
मारुती अटिंगा
सध्याची किंमत - 9.1 लाख
किती वाचतील - 90 हजार
टोयोटा इनोव्हा
सध्याची किंमत - 20 लाख
किती वाचतील - 2.6 लाख
लक्झरी कार
बीएमडब्यू ५ सिरीज
सध्याची किंमत - 76.5 लाख
किती वाचतील - 4 लाख
बीएमडब्यू एक्स 7
सध्याची किंमत - 1.4 कोटी
किती वाचतील - 9 लाख
स्कुटर्स
होंडा अॅक्टिव्हा
सध्याची किंमत - 81 हजार
किती वाचतील - 7 हजार
टीव्हीएस एनटॉर्क
सध्याची किंमत - 87.9 हजार
किती वाचतील - 7.5 हजार
बाइक
होंडा शाइन 125
सध्याची किंमत - 90.3 हजार
किती वाचतील - 7.7 हजार
बजाज पल्सर 150
सध्याची किंमत - 1.1 लाख
किती वाचतील - 9.5 हजार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world