देशातील सर्वात मोठी स्टॉक एक्स्चेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) ने आपल्या Initial Public Offering (IPO) साठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे Draft Red Herring Prospectus (DRHP) दाखल केला आहे. हा आयपीओ पूर्णपणे Offer For Sale (OFS) स्वरूपाचा असणार आहे.
या ऑफरअंतर्गत 14,89,05,525 शेअर्सची विक्री करण्यात येणार असून हा हिस्सा कंपनीच्या पेड-अप कॅपिटलच्या जवळपास 6 टक्के आहे. या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. प्रत्येक शेअरचे फेस व्हॅल्यू 1 रुपये आहे.
बड्या बँका आणि विमा कंपन्या आपला हिस्सा विकणार
स्टेट बँक ऑफ इंडिया, एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस) लिमिटेड, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरांडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) पीटीई लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे विद्यमान भागधारक या ऑफरमध्ये आपले शेअर्स विकणार आहेत.
कोणासाठी किती कोटा राखीव?
बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे हा आयपीओ आणला जाणार आहे. नेट ऑफरपैकी जास्तीत जास्त 50 टक्के हिस्सा Qualified Institutional Buyers (QIBs) साठी, किमान 15 टक्के हिस्सा Non-Institutional Investors (NIIs) साठी आणि किमान 35 टक्के हिस्सा Retail Investors साठी राखीव ठेवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
1992 मध्ये स्थापन झालेली NSE ही कॅश मार्केटमधील एकूण टर्नओव्हर आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील एकूण टर्नओव्हरच्या दृष्टीने आर्थिक वर्ष 2001 ते 2026 या कालावधीत भारतातील सर्वात मोठी स्टॉक एक्स्चेंज राहिली आहे. तसेच Exchange-Traded Currency Derivatives मध्येही आर्थिक वर्ष 2009 ते 2026 या कालावधीत ती देशातील सर्वात मोठी एक्स्चेंज राहिली असल्याचे Redseer च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये जगात अव्वल स्थान
World Federation of Exchanges च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये 36.99 अब्जांहून अधिक कॉन्ट्रॅक्ट्सची नोंद करत NSE ने जगातील सर्वात मोठी Equity Derivatives Exchange म्हणून आपले स्थान कायम राखले. 31 मार्च 2026 पर्यंत कॅश मार्केटमधील एकूण टर्नओव्हरच्या दृष्टीने ती भारतातील सर्वात मोठी एक्स्चेंज असून, कॅश इक्विटी व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाची एक्स्चेंज आहे.
NSE ही भारतातील "फर्स्ट लेव्हल रेग्युलेटर" म्हणूनही काम करते. गुंतवणूकदार, इश्यूअर्स आणि इंटरमिजिएरीज यांना समान, पारदर्शक आणि निर्बंधमुक्त प्रवेश उपलब्ध करून देणे, बाजारातील शिस्त आणि कार्यक्षमता कायम राखणे तसेच गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणे ही तिची प्रमुख जबाबदारी आहे.
NSE ही Vertically Integrated Stock Exchange असून ट्रेडिंग, क्लिअरिंग, लिस्टिंग, Data Feed Services, Data Terminal Services आणि Licensing Services अशा विविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देते. कॅश मार्केट, फ्युचर्स, ऑप्शन्स, म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, Exchange-Traded Currency Derivatives, Wholesale Debt Market आणि Interest Rate Futures यांसह विविध Asset Classes मध्ये ती कार्यरत आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर भांडवली बाजार अधिक व्यापक करण्यामध्ये NSE ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 31 मार्च 2020 रोजी 3.087 कोटी असलेला Unique Registered Investors Base 31 मार्च 2026 रोजी 12.91 कोटींवर पोहोचला आहे. या कालावधीत त्यात 26.9 टक्के CAGR वाढ झाली आहे.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
आर्थिक वर्ष 2026 मध्ये NSE च्या प्लॅटफॉर्मद्वारे 20.3 ट्रिलियन रुपयांचा निधी उभारण्यात आला. 31 मार्च 2026 पर्यंत एक्स्चेंजवरील गुंतवणूकदार भारतातील 99 टक्क्यांहून अधिक पिनकोडमध्ये पसरलेले होते. NSE च्या Non-Trading व्यवसायांमध्ये NSE Clearing Limited, NSE Indices Limited, NSE Data and Analytics, GIFT City मधील NSE International Exchange तसेच म्युच्युअल फंड रजिस्ट्री सेवा आणि Back-End Support Services यांचा समावेश आहे.
NSE ची आर्थिक कामगिरी
31 मार्च 2026 पर्यंत NSE च्या प्लॅटफॉर्मवर दररोज सरासरी 12 ते 14 अब्ज संदेशांची प्रक्रिया होत होती. 4 जून 2024 रोजी सर्व विभागांमधील एकत्रित व्यवहारांची संख्या 29.38 कोटींवर पोहोचली होती, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचे Revenue from Operations 16,601 कोटी रुपये होते, तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये ते 14,780 कोटी रुपये होते. याच कालावधीत कंपनीचा Net Profit 8,305 कोटी रुपयांवरून 10,302 कोटी रुपयांपर्यंत वाढला.