ऑनलाईन शॉपिंग करताना तुमचा खिसा कसा कापला जातो; या ट्रॅपमधून कसं वाचाल?

ऑनलाईन शॉपिंगची सवय तुमचं बँक बलेन्स तर खाली करत नाही ना? याकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. तुमचा खिसा कसा कापला जाऊ शकतो ते पाहुया.  

जाहिरात
Read Time: 3 mins

ऑनलाईन शॉपिंग आणि पेमेंटमुळे अनेक कामे क्षणात होतात. मात्र अनेकदा ऑनलाईन शॉपिंग आणि पेमेंटद्वारे तुमचा खिसा कापला जातो आणि तुम्हाला ते कळत देखील नाही. ई-कॉमर्स वेबसाईट्स अशा काही आयडिया वापरतात ज्यामुळे तुमच्या नकळत तुमचा खर्च वाढतो. ई-कॉमर्स कंपन्या काय ट्रिक्स वापरतात आणि त्यापासून आपले पैसे कसे वाचवायचे यावर एक नजर टाकुया. 

घरातलं सामान मागवणे असो की विमानाचं तिकीट बूक करणे सर्वकाही मोबाईलवर शक्य आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे तुमची अनेक कामे सोपी होतात. मात्र ऑनलाईन शॉपिंगची सवय तुमचं बँक बलेन्स तर खाली करत नाही ना? याकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. तुमचा खिसा कसा कापला जाऊ शकतो ते पाहुया.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बास्केट स्नीकिंग

ई कॉमर्स वेबसाईटवरील ऑनलाईन सेलर ग्राहकाच्या परवानगीशिवाय काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्याच्या कार्टमध्ये अॅड करतात. जसं की विमानाचं तिकीट खरेदी केल्यास इन्शुरन्स चार्ज किंवा एखाद्या संस्थेला डोनेशन इत्यादी. या गोष्टीसाठीचे चार्ज खूप कमी असतात. त्यामुळे ग्राहक देखील याकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि थेट पेमेंट करतात. त्यामुळे चेक आऊट करण्याआधी आपलं कार्ट जरुर चेक करा. बिलाचं ब्रेकअप देखील चेक करा. जेणेकरुन जास्तीचे पैसे कुठे गेलेत का, याची माहिती तुम्हाला मिळेल. 

नक्की वाचा- PF अकाऊंटमधून पैसे काढणे झाले सोपे; काय आहे प्रक्रिया? वाचा

सबस्क्रिप्शन प्लान 

एखाद्या सबस्क्रिप्शन असलेल्या साईट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साईन इन करण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. मात्र ते कॅन्सल करणे तितकच अवघड बनवलेले असते. अनेकदा सबस्क्रिप्शन कॅन्सलेशन पॉलिसी देखील नीट दिलेली नसते. त्यासाठी कस्टमर केअरला फोन करुन तुम्हाला त्याबाबत माहिती विचारावी लागते. मात्र ही प्रक्रिया इतकी वेळखाऊ असते की ग्राहकाला सबस्क्रिप्शन सुरु ठेवणे सोपे वाटू लागते. मात्र यामुळे तुम्ही अशा प्लानचे पैसे भरत राहता, जो तुम्हाला कधी हवाच नसतो. त्यामुळे सर्व वाचून नीट वाचूनच एखादा प्लान सबस्क्राईब करा. 

Advertisement

(नक्की वाचा - 15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या)

प्रोडक्ट सर्व्हिस कॉस्ट

अनेक ई कॉमर्स साईटवर वस्तूंच्या किमतीसोबत त्याच्यासोबतच्या सर्व्हिस चार्जेसची माहिती स्पष्टपणे दिलेली नसते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, अनेक वस्तूंची अंतिम किंमत दिलेली नसते. वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला या वस्तूवर असलेल्या इतर चार्जेसची माहिती मिळते. जसं की, सर चार्ज, ट्रान्सपोर्ट फी, सेट अप चार्ज याची माहिती दिलेली नसते. मात्र तुम्ही वस्तू खरेदी केलेली असते, त्यामुळे या अधिकच्या खर्चापासून वाचण्याचा पर्याय तुमच्याकडे नसतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदीआधी बिलाच्या शेवटी असलेल्या Terms and Conditions नक्की वाचा. त्यानंतरच Buy Now वर क्लिक करा. तसेच ऑनलाईन शॉपिंग विश्वासार्ह साईटवरुनच करा.   

VIDEO : मतदार यादीत नाव शोधायची सर्वात सोपी पद्धत, क्लिकवर सापडेल नाव

Topics mentioned in this article