जाहिरात
This Article is From May 15, 2024

15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या

ईपीएफओच्या नियमांनुसार, ईपीफ अकाऊंटमधून काही रक्कम गरजेच्या वेळी कर्मचारी काढू शकतात. मात्र संपूर्ण रक्कम काढता येत नाही.

15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मधील गुंतवणूक निवृत्तीनंतर फायद्याची ठरते. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही विशिष्ट रक्कम पीएफमध्ये जमा होते. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी असं दोघांकडून योगदान दिलं जातं. कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार ही रक्कम ठरते. सध्या EPF वर 8.25 टक्के व्याज मिळते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ईपीएफओच्या नियमांनुसार, ईपीफ अकाऊंटमधून काही रक्कम गरजेच्या वेळी कर्मचारी काढू शकतात. मात्र संपूर्ण रक्कम काढता येत नाही. ईपीएफमधून निवृत्तीपर्यंत पैसे काढले नाही तर मोठा निधा जमा होतो. ईपीएफ अकाऊंटसाठी कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याच्या एकत्रित रकमेच्या 12 टक्के रक्कम ईपीएफसाठी दरमाह कापली जाते. 

15000 पगार असल्यास किती रक्कम EPF मध्ये जमा होते?

  • बेसिक सॅलरी + महागाई भत्ता = 15000 रुपये
  • EPF मध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान = 15000 रुपयांच्या 12 टक्के = 1800 रुपये
  • कंपनीचं EPF मधील योगदान = 15000 रुपयांच्या 3.67 टक्के = 550.5 रुपये
  • कंपनीचं EPS मधील योगदान = 15000 रुपयांच्या 8.33 टक्के = 1249.5 रुपये
  • EPF खात्यात दरमाह योगदान= 1800 + 550.5 = 2350.5 रुपये    

(नक्की वाचा- शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्याचा NSEचा प्रस्ताव सेबीने फेटाळला)

ईपीएफ खात्यातील रकमेवर वार्षिक 8.25 टक्के व्याज मिळते. यानुसार 15000 रुपये पगार असल्यास 25 व्या वर्षापासून कर्मचाऱ्याने गुंतवणूक केल्यास 60 वर्षापर्यंत त्याचे 27 लाख 3 हजार 243 रुपये जमा होतील. यामध्ये पगारवाढीचा देखील समावेश आहे. जमा झालेल्या रकमेवर 8.25 टक्के व्याजदरानुसार 35 वर्षात कर्मचाऱ्याच्या नावे निवृत्तीच्या वेळी 1 कोटी 9 लाख रुपये जमा होतील. याच कॅल्क्युलेशननुसार, 30 हजार पगार असल्यास 2 कोटी 17 लाख रुपये जमा होतील. तर 40 हजार पगार असल्यास 2 कोटी 90 लाख रुपये जमा होतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com