PAN कार्डमध्ये असतो तुमच्या नावाचाही समावेश, काय असतो नंबरचा अर्थ?

PAN Number : तुमच्या पॅन कार्डवर असलेल्या 10 अक्षर आणि अंकाचा अर्थ माहिती आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins
PAN Number नेहमी 10 अक्षर-अंकाचे (Alpha-Numeric Number) कॉम्बिनेशन असते.
मुंबई:

आपल्या देशात आधार कार्डनंतर (Aadhaar Card)  सर्वात जास्त आवश्यक कागदपत्र हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिले जाणारे परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच PAN समजले जाते. नेहमीच एकाच पद्धतीनं दिल्या जाणाऱ्या 10 अक्षर-अंकाच्या  (Alpha-Numeric Number) कॉम्बिनेशनचा एक खास अर्थ असतो. कोणत्याही दोन व्यक्तीला दिला जाणारा PAN Number एकसारखा कधीही नसतो. 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) कोणत्याही व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या टॅक्स संबंधातील देवाण-घेवाण आणि सुचना  PAN Number च्या आधारावरच नोंद करते. कर विभागाला कोणत्याही व्यक्तीच्या कराबाबतचा रेकॉर्ड ट्रॅक करणे यामुळे शक्य होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे PAN वरील 10 अक्षर-अंकाचा अर्थ?

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक करदात्याला PAN कार्ड जारी करते. PAN Card देण्यात आलेल्या व्यक्तीला एक्सक्लूसिव्ह PAN Number नंबरसह त्याचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, स्वाक्षरी आणि फोटो याचा समावेश असतो.

Pan Number मध्ये नेहमी 10-अक्षर-अंकाचा (Alpha-Numeric Number)  समावेश असतो. यामधील पहिले पाच इंग्रजी भाषेतील वर्णाक्षरं असतात. त्यानंतर चार अंक आणि शेवटी पुन्हा इंग्रजी भाषेचं वर्णाक्षर असते. उदाहरणार्थ एखादा पॅन नंबर हा ABCPX1234Z या पद्धतीनं असतो. 

Advertisement

पॅन नंबरमधील पहिले तीन इंग्रजी वर्णमालेतील कोणत्याही पद्धतीचे वर्णाक्षर असतात. ही वर्णाक्षरं 'AAA ते 'ZZZ' या दरम्यान काहीही असू शकतात. 

( Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
 

PAN Number मधील चौथं अक्षर करदात्याचं स्टेटस दाखवतो. उदाहरणार्थ चौथं अक्षर P असेल तर ती तो व्यक्तिगत करदाता (Individual Taxpayer) असल्याची खूण आहे. त्याचबरोबर PAN नंबरमधील चौथं अक्षर 'C' असेल तर ते कंपनीची खूण आहे. तर चौथं अक्षर 'H' असेल तर करदाता हिंदू अविभाज्य कुटुंब  (HUF) म्हणून इन्कम टॅक्स फाईल करणारा आहे, असा अर्थ निघतो. PAN Number मधील चौथं अक्षर 'F' असेल तर करदाता फर्म असल्याचा तो संकेत आहे. 

( Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

PAN नंबरमधील पाचवं अक्षर देखील इंग्रजी वर्णमालेतील अक्षर असते. पण ते करदात्या आडनावाचे (Last Name)  पहिले अक्षर असते.  त्यानंतर PAN Number मध्ये चार अंक असतात. जे रँडम  पद्धतीनं '0001' '9999' दरम्यानची कोणतीही संख्या असू शकते. 

Advertisement
Topics mentioned in this article