Children Property: आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार असतो, हे बहुतेकांना माहिती आहे. पण, मुलांच्या संपत्तीवर आई-वडील त्यांचा हक्क (Rights on children's property) सांगू शकतात का? हे अनेकांना माहिती नाही. या विषयावर कायदा काय सांगतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतीय कायद्यानुसार काही खास परिस्थितीमध्ये आई-वडील मुलाच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीमध्ये आई-वडील मुलाच्या संपत्तीवर दावा करु शकतात हे प्रत्येक पालकांना माहिती हवं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कायदा?
हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार सामान्य परिस्थितीमध्ये आई-वडिलांना मुलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही. पण, काही खास परिस्थितीमध्ये आई-वडील दावा करु शकतात. सरकारनं हिंदू उत्तराधिकार अधिनियम 2005 मध्ये संशोधन केलं आहे. त्यामध्ये मुलांच्या संपत्तीवरील आई-वडिलांचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये आई-वडिल त्यांचा हक्क सांगू शकतात हे या कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
कायद्यानुसार मुलाचा एखाद्या अपघातामध्ये अथवा आजारपणामध्ये अकस्मिक मृत्यू झाला आणि मुल सज्ञान आणि अविवाहित असेल, तसंच त्यानं मृत्यूपत्रक तयार केलं नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आई-वडील मुलाच्या संपत्तीवर दावा करु शकतात. पण, त्या परिस्थितीमध्ये आई-वडिलांचा संपत्तीचा अधिकार हा वेगवेगळा असतो.
( नक्की वाचा : Income Tax : करदात्यांना आनंदाची बातमी! 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार सरकारकडून दिलासा )
पहिला अधिकार कुणाला?
न्यूज 18 नं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकराच्या परिस्थितीमध्ये मुलाच्या संपत्तीवर दावा करण्याचा पहिला अधिकार त्याच्या आईला असतो. याचा अर्थ आई पहिली वारस मानली जाते. तर वडील दुसरी वारस असते. वारसांच्या यादीमध्ये आईचा समावेश नसेल तर त्या परिस्थितीमध्ये वडिलांना मुलाच्या संपत्तीचा अधिकार असतो. दुसरे दावेदार म्हणून अधिकार सांगणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते. ती संख्या जास्त असेल तर त्यांना वडिलांच्या बरोबरीनं अधिकार मिळतो.
मुलगा आणि मुलीसाठी वेगळा कायदा
हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलाच्या संपत्तीवर आई वडिलांचा अधिकार मुलाचे लिंग म्हणजेच जेंडरवरही अवलंबून असतो. मुलगा आणि मुलीसाठी कायदे वेगवेगळे आहेत. लग्न न झालेल्या मुलाचा मृत्यू झाला तर संपत्तीचा पहिला अधिकार हा त्याच्या आईला मिळतो. तर वडील आणि अन्य नातेवाईक दुसरे दावेदार असतात. मुलगा विवाहित असेल आणि त्याचा मृत्यूपत्र न लिहीता मृत्यू झालातर त्याच्या पत्नीचा संपत्तीवर पहिला अधिकार असतो.
( नक्की वाचा : Bajaj Chetak: 'या' नव्या लुकमध्ये बजाज चेतक मार्केटमध्ये दाखल, पाहा खास फिचर्स आणि किंमत )
विवाहित मुलीचा मृत्यू झाला तर संपत्तीचा पहिला अधिकार तिच्या मुलांना आणि नंतर तिच्या नवऱ्याला दिला जाईल. मुलं नसतील तर तिच्या संपत्तीवर दावा करण्याचा पहिला हक्क नवऱ्याचा आणि नंतर तिच्या आई-वडिलांचा असतो.