Job Opportunities : पुणे की बंगळुरू, कोणतं शहर नोकरदारवर्गासाठी बेस्ट? 'त्या' LinkedIn पोस्टवरुन चर्चेला उधाण

या पोस्टच्या निमित्ताने दोन महत्त्वाची शहरं, तेथे तरुणांना मिळणारी संधी, पगार, जीवनशैली, तेथील राहणीमान या गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Job Satisfaction : सध्या देशभरातील मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये नोकरीनिमित्ताने स्थलांतर होणाऱ्या तरुणवर्गाची संख्या सर्वाधिक आहे. बड्या आयटी कंपन्या, नोकरीची संधी, रग्गड पगार, चांगलं पद यांसारख्या अनेक कारणांसाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतो. मात्र नोकरीबरोबरच ते शहर, तेथील राहणीमान, जीवनशैली यासांरख्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. त्यावर आधारित LinkedIn वरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये बंगळुरू आणि पुणे या दोन्ही शहरांची तुलना करण्यात आली आहे. त्यामुळे LinkedIn वर पुणे विरुद्ध बंगळुरू असा वाद पाहायला मिळत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

LinkedIn वर इशान अरोरा या स्टोरीटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:सोबतचा अनुभव कथन केला आहे. यात तो म्हणतो.  माझ्या मित्राने पुण्यातील ₹18 लाख वार्षिक पगाराची नोकरी सोडून बंगळुरूमध्ये 40%  अधिक पगाराच्या (₹25 लाख वार्षिक) नोकरीसाठी स्थलांतर केलं. परंतु, बंगळुरूमधील उच्च राहणीमान खर्च, जसे की जास्त घरभाडं, वाहतुकीची अडचण आणि इतर दैनंदिन खर्च, यामुळे त्याला आर्थिक समाधान मिळाले नाही. इशान अरोरा याच्या या पोस्टमुळे पुणे विरुद्ध बंगळुरू असा वाद सुरू झाला आहे. इशानच्या पोस्टवर संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अनेकांनी त्याच्या पोस्टचं समर्थन केलं आहे. बंगळुरूमध्ये राहणीमान खूप जास्त उंचावलं आहे. येथे घरभाडं आणि डिपॉझिट खूप जास्त आकारलं जातं. त्याशिवाय वाहतुकीच्या कोंडीमुळे जीव हैराण होतो असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र बंगळुरूच्या समर्थनार्थही अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. बंगळुरूत 6 लाख पॅकेच असणारी व्यक्तीही राहते. त्यामुळे तुमच्या मित्राला आर्थिक व्यवस्थापन शिकणं गरजेचं असल्याचं काही वापरकर्त्यांचं म्हणणं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Investment : वयाच्या 35 व्या वर्षी PPF खातं उघडा, निवृत्तीनंतर मिळेल 61,000 टॅक्स फ्री मासिक पेन्शन

एका विवेक के नावाच्या इंजिनियर तरुणाने लिहिलं, पुणे टायर टू सिटी आहे. इथले रस्ते म्हणजे थट्टा आहे. दुचाकी चालक आणि रिक्षाचालकांना गाडी चालविण्याचा बेसिक सेन्स नाही. इथं कायम वाहतुकीची कोंडी होत असते. वडगाव शेरीसारख्या ठिकाणीही २बीएचकेसाठी 35-40 हजार घरभाडं मोजावं लागतं. त्यामुळे दोन्हीही शहरात बचत काहीच होत नाही. त्यामुळे चांगली वाढ घेऊन बंगळुरूत जा आणि पगार चांगला वाढला की पुण्यात परता. मीदेखील हेच केलं. 

Advertisement

इशान अरोरा यांची पोस्ट...

पुण्यातील एका मित्राने 18 एलपीएची नोकरी सोडली.

आणि बंगळुरूमध्ये त्याला 25 एलपीए देऊ करणाऱ्या एका फर्ममध्ये सामील झाला.

शहरात एक वर्ष घालवल्यानंतर, त्याने काल मला फोन केला

इशान, मी शहरं बदलायला नको होतं.

पुणे खूपच चांगलं होतं, 25 एलपीए बंगळुरूमध्ये काहीच वाटत नाही

माझा मित्र म्हणाला

मी म्हणालो, अरे तू असं का म्हणतोय...

40%  ही चांगली वाढ आहे, तू जास्त पैसे वाचवत असशील.

तुला परत का यायचं आहे?"

मी उत्सुकतेने विचारले...

बंगळुरूसाठी हे खूप आहे.

येथे घरभाडं खूप जास्त आहे.

इथले घरमालक 3-4 महिन्यांचं डिपॉझिट मागतात

वाहतूक भयानक आहे आणि प्रवास खर्च खूप जास्त आहे.

मला पुण्यातील 15 रुपयांचा वडा पाव आठवतो.

किमान तिथे आयुष्य आणि बचत चांगली होती

इतकं म्हणून त्याने फोन ठेवून दिला..

या पोस्टनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बंगळुरू राहण्यासाठी खूप महाग आहे का? इथं 25 एलपीए कमी आहे? पुण्यातील राहणीमान, आर्थिक स्थैर्य बंगळुरूपेक्षा चांगलं आहे का? बंगळुरूतील वाहतूक कोंडी पुण्यापेक्षाही भीषण आहे का?