Ratan Tata : रतन टाटांनी मृत्यूपत्रात ठेवली अशी अट की एकाही वारसदाराला देता येणार नाही कोर्टात आव्हान

Ratan Tata Will : देशातील सर्वात वंदनीय उद्योगपतींमधील एक असलेल्या रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राचं रहस्य उघड झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशातील सर्वात वंदनीय उद्योगपतींमधील एक असलेल्या रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राचं रहस्य उघड झालं आहे. टाटा यांचं ऑक्टोबर 2024 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी स्वत:च्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता. टाटा यांची एकूण संपत्ती 3,800 कोटी आहे. त्यांनी मृत्यूपत्रामध्ये त्याची संपूर्ण विभागणी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोर्टात देता येणार नाही आव्हान

टाटा यांच्या मृत्यूपत्रात एक खास अट आहे. त्यामुळे त्यांच्या वारसदारांपैकी कुणालाही या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान देता येणार नाही. या अटीला 'नो कंटेस्ट क्लॉज' असं सांगितलं जात आहे. यानुसार एखाद्या लाभार्थ्यानं या मृत्यूपत्राला आव्हान दिलं तर त्याला या मृत्यूपत्रातून मिळणारे सर्व अधिकार आणि फायदे गमावावे लागतील. टाटा सन्सच्या शेअर्सच्या विक्रीवरील निर्बंधासाठी देखील ही अट ठेवण्यात आली आहे. आपल्या संपत्तीचा वापर निश्चित उद्देशासाठीच व्हावा या हेतूनं टाटा यांनी ही अट ठेवली आहे. 

रतन टाटा यांनी त्यांच्या उर्वरित संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा सावत्र बहीण शिरीन जेजेभोय आणि डीना जेजोभाय यांना दिला आहे. त्यांना मिळालेल्या संपत्तीमध्ये बँकेतील ठेवी, आर्थिक साधनं, घड्याळ, पेंटिंग यांचा समावेश आहे. या संपत्तीची अंदाजे किंमत 800 कोटी इतकी आहे. टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता यांना दिला आहे. दत्ता टाटा ग्रुपचे माजी कर्मचारी असून ते रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते.

( नक्की वाचा : Ratan Tata : रतन टाटांच्या 3800 कोटींच्या संपत्तीमध्ये कुणाला काय मिळालं? वाचा सविस्तर )

टाटा यांच्या मृत्यूपत्राची वैशिष्ट्ये

  • टाटा सन्सचे शेअर्स आणि अन्य संपत्ती  टाटा एंडोमेट फाऊंडेशन (RTEF) आणि टाटा एंडोमेंट ट्रस्ट  (RTET) या स्वयंसेवी संस्थांना दान करण्यात आली आहे.
  • बँकेतील ठेवी आणि वैयक्तित संपत्तीमधील एक तृतीयांश हिस्सा सावत्र बहिणींना देण्यात आला आहे.
  • टाटा ग्रुपचे माजी कर्मचारी मोहिनी दत्ता यांना एक तृतीयांश हिस्सा देण्यात आला आहे. ते रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते.
  • रतन टाटा यांनी त्यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांना जुहूमधील संपत्ती दिली आहे.
  • टाटा यांनी त्यांचे खास मित्र मेहली मिस्त्री यांचीही आठवण ठेवली आहे. त्यांना अलिबागची संपत्ती (6.16 कोटी) देण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article