रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर कसा होईल परिणाम?

RBI Imposes Monetary Penalty: रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
RBI Action on Banks: RBI ने CSB Bank पर 1.06 करोड़ रुपये का जुर्माना लगाया गया है.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 बँका आणि 3 फायनान्स कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.

सीएसबी बँकेला 1.86 कोटी रुपयांचा दंड 

RBI ने CSB बँकेला वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील जोखीम तसेच व्यवस्थापनासंबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.86 कोटी रुपयांया दंड ठोठावला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युनियन बँक ऑफ इंडियाला 1.06 कोटी रुपयांचा दंड

रिझर्व्ह बँकेने युनियन बँक ऑफ इंडियाला KYC शी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि इतर कारणांमुळे 1.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

(नक्की वाचा-  ठाकरे गटाच्या निष्ठावंताची हत्या, पत्नीचं 'ठाकरे' कनेक्शन समोर आल्यानं खळबळ)

मुथूट हाऊसिंग फायनान्सला 5 लाख रुपयांचा दंड

मुथूट हाऊसिंग फायनान्सला'नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी - हाउसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश, 2021' च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

याशिवाय निडो होम फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपये आणि अशोका विनियोग लिमिटेडला 3.1 लाख रुपयांचा दंडही रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

(नक्की वाचा - सावधान! मुंबई पुढील 16 वर्षांत होणार गायब? मुंबईकरांची चिंता वाढवणारे संशोधन समोर)

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

संबंधित बँका आणि फायनान्स कंपनांना लावण्यात आलेला दंड नियमांचे उल्लंघन आधारित आहेत. या कारवाईचा संस्थांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित नाहीत. ही कारवाई आरबीआय बँकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडत असल्याचे द्योतक आहे. यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळू शकतील. याशिवाय ग्राहकांचे पैसे  देखील सुरक्षित राहतील. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे ग्राहकांचे नुकसान नाहीतर फायदा होईल.

Advertisement

Topics mentioned in this article