जाहिरात

ठाकरे गटाच्या निष्ठावंताची हत्या, पत्नीचं 'ठाकरे' कनेक्शन समोर आल्यानं खळबळ

Navi Mumbai Crime News : विष्णू गवळी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. ते सामाजिक चळवळीची कार्यकर्ते देखील होते.

ठाकरे गटाच्या निष्ठावंताची हत्या, पत्नीचं 'ठाकरे' कनेक्शन समोर आल्यानं खळबळ

राहुल कांबळे, नवी मुंबई

शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्याची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे.  ड्रायव्हरसोबतचे अनैतिक संबंधांची माहिती समोर आल्याने पत्नीने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.   

विष्णू बाबाजी गवळी ( वय 58) असं हत्या झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव आहे. तर अश्विनी गवळी (38 वर्ष) आणि समीर ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी हिचे ड्रायव्हर समीर ठाकरेसोबत प्रेमसंबंध होते. विष्णू गवळी यांना देखील याबाबत समजलं होतं. त्यांनी वारंवार विरोध करुनही दोघांचं हे प्रेम प्रकरण गेल्या पाच वर्षापासून सुरू होते. या प्रेमप्रकरणामध्ये पती अडथळा ठरत असल्याने अश्विनी हिने विष्णू यांना संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने प्रियकर समीरची मदत घेतली. हत्येनंतर सर्व संपत्ती आपल्याला मिळेल असं देखील अश्विनीला वाटत होतं. यातूनच विष्णू यांची राहत्या घरीच आश्विनी आणि ड्रायव्हर समीर यांनी हत्या केली. 

(नक्की वाचा- ऑन ड्युटी, फूल टाईट; दारुच्या नशेत डॉक्टर रुग्णालयात, गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार)

विष्णू गवळी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. ते सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते देखील होते. विष्णू गवळी यांच्या हत्येमुळे नवी मुंबई येथील खांदेश्वर पनवेल या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. 

(नक्की वाचा - सावधान! मुंबई पुढील 16 वर्षांत होणार गायब? मुंबईकरांची चिंता वाढवणारे संशोधन समोर)

नवी मुंबई पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की, मृत विष्णू गवळी यांच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे दोन्ही आरोपींविरोधात कलम 103(1) (हत्या) आणि 3(5) (अनेक जणांनी केलेले गुन्हेगारी कृत्य) अन्वये एफआयआर खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी फरार आहेत. या गुन्ह्यात कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com