New Rules 2024: 1 ऑगस्टपासून देशभरात 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम !

Rule Changes from 1st August: देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होतात. येत्या 1 ऑगस्ट रोजी देखील अनेक बदल होत आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
N
मुंबई:

Rule Changes from 1st August: जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरु होण्यास आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होतात. येत्या 1 ऑगस्ट रोजी देखील अनेक बदल होत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. पुढच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीसह एचडीएफसीच्या क्रेडीट कार्डापर्यंत कोणत्या प्रमुख नियमांमध्ये बदल होणार आहेत, ते पाहूया

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

LPG सिलेंडरचे दर कमी होणार?

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये (LPG gas cylinder prices) बदल केला जातो. गेल्या महिन्यात सरकारनं 19 किलोंच्या कर्मशियल सिलेंडरचे दर कमी केले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सरकार एलपीजी सिलेंडरचे दर कमी करण्याची शक्यता आहे.  

13 दिवस बँकांना सुट्टी

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस बँकांना सुट्टी  (Bank Holidays  in August) आहे. तुमचे बँकिंगसंबंधात काही कामं असतील तर बँकेत जाण्यापूर्वी एकदा बँकेच्या सुट्टींची यादी (August Bank Holiday List) नक्की पाहा. कारण, ऑगस्ट महिन्यात तब्बल 13 दिवस बँकांचं कामकाजद बंद असेल. 

( नक्की वाचा : सोनं होणार स्वस्त! संपूर्ण देशभर असणार एकच भाव? काय आहे नवं धोरण? )
 

ITR उशीरा भरला तर दंड

तुम्ही 31 जुलै 2024 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न  (ITR Filing 2024) फाईल केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही आयटीआर फाईल केला नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून आणखी एक संधी मिळते. तुम्ही वर्षाअखेरपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2024 पर्यंत  बिलेटेड रिटर्न (Belated ITR Filing) भरु शकता. पण, तुम्हाला तुमच्या कमाईनुसार बिलेटेड रिटर्न (Belated ITR Filing) दंड भरावा लागू शकतो.

Advertisement

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

गूगल मॅप्समध्ये मोठे बदल

गूगल मॅप्समध्ये (Google Maps) देशभर मोठे बदल होत आहेत. 1 ऑगस्टपासून कंपनी त्यांचा सर्विस चार्ज 70 टक्क्यांपेक्षा कमी करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पार्टनर यामध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर बिलिंग डॉलरहून रुपयांमध्ये बदल होणार आहे. सामान्य युझर्सवर याचा कोणताही परिणाम होणार आहे. म्हणजेच  Google Maps च्या रोजच्या वापरावर काहीही परिणाम होणार नाही. 

HDFC क्रेडीट कार्डावर अतिरिक्त चार्ज

ऑगस्ट महिन्यापासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डाचे नियम (HDFC Bank credit card rules) बदलणार आहेत. तुम्हाला काही खर्चांवर अतिरिक्त चार्ज द्यावा लागू शकतो. क्रेडिट कार्डच्या  CRED, Cheq, MobiKwik, Freecharge अ‍ॅप्सवरुन रेंट दिले तर 1 टक्के ट्रांजेक्शन चार्ज लागणार आहे. त्याचबरोबर 5 हजार रुपयांपेक्षा जास्त एकाच वेळी पेट्रोल आणि डिसेल भरल्यावर 1 टक्के चार्ज लागेल. 50 हजारांपेक्षा जास्त वीज, पाणी बिल भरल्यावरही 1 टक्के चार्ज लागेल. बँकेनं लेट पेमेंटचे चार्जही वाढवले आहेत. हा एक्स्ट्रा चार्ज प्रत्येक वेळी 3000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.  
 

Advertisement