Silver Investment : गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणं मोठं जिकरीचं झालं आहे. दरम्यान सोन्याला चांगला परतावा देणारा पर्याय समोर आला असून यामुळे गुंतवणुकदारांना मोठा नफा मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. यंदा चांदीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या दरांनी सोनं आणि शेअर मार्टेलाही मागं टाकलं आहे. यंदा चांदीने १४२ हून अधिक रिटर्न दिले आहेत.
सोनं हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानला जातो. सोन्याने २०२५ या वर्षी ७८ टक्के परताना दिला, तर चांदीनेच हा परतावा १४२ टक्क्यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांतील चांदीचा ग्राफ पाहिला तर किमतीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.
१ किलो चांदीचा वाढता ग्राफ...
२००० वर्षात - ७९००
२००५ - १०,६७५
२०१० - २७,२५५
२०१५ - ३७,८२५
२०२० - ६३,४३५
२०२४ - ९०,५००
२०२५ - २,१७,२५०.
नक्की वाचा - Money Saving Tips: पगार येताच गायब होतो? नव्या वर्षात आर्थिक व्यवस्थापनात करा 7 महत्त्वाचे बदल; लखपती व्हाल!
चांदी दराच्या वाढीची कारणं..
सौर ऊर्जा उपकरणं, इलेक्ट्रिक वाहनं, एआय सारख्या विविध क्षेत्रात चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दुसरीकडे खाणीतून होणारा चांदीचा पुरवठा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
२०२६ मध्ये चांदीमधील गुंतवणूक किती फायद्याची?
२०२५ वर्ष चांदी गुंतवणुकदारांसाठी फायद्याचं ठरलं. मात्र २०२६ मध्ये गुंतवणूक करायचं असल्याचं किती फायदा होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने चांदीमध्ये पुढील वर्षभरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होऊ शकते असं सांगितलं जातं आहे.
२०२५ मध्ये १ लाख गुंतवणूक केली असती तर किती झाले असते...
चांदी - १,४२,०००
सोनं - १,७८,०००
सेन्सेक्स ० १,०८,०००
एफडी - १,०७,५००