- बेंगलुरु में सोशल मीडिया इंफ्लुएंसर संजीव की करीब 10 करोड़ रुपये की लेम्बोर्गिनी एवेंटाडोर में आग लग गई.
- आग लगने के दौरान कार के पिछले हिस्से से लपटें उठती दिखीं और लोग आग बुझाने के प्रयास में जुटे नजर आए.
- संजीव के इंस्टाग्राम पर दो लाख से ज्यादा फॉलोअर्स हैं और उन्हेंं सोने के आभूषण पहनने के कारण भी जाना जाता है.
Car Fire Video: बंगळुरूच्या एका रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एका लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर स्पोर्ट्स कारला आग लागल्याची घटना घडली. या स्पोर्ट्स कारची किंमत सुमारे 10 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. ही कार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संजीव याची आहे. तो त्यांच्या 'निम्मा माने मागा संजू' (Nimma Mane Maga Sanju) या इंस्टाग्राम हँडलवरून प्रसिद्ध आहेत.
या कारला आग लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, ही एक दिलासादायक बाब आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पोर्ट्स कारच्या मागील बाजूने आगीच्या आग लागल्याचे दिसून येत आहे. काही लोक पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. लॅम्बोर्गिनी कारचे इंजिन मागील बाजूस असल्याने, आग नेमकी त्याच भागातून सुरू झाल्याचे दिसून येत आगे. काही वेळात आग नियंत्रणात आणण्यात यश आले. काही लोकांनी दावा केला की कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, संजीव यांनी नंतर स्पष्ट केले की, गाडीचे फक्त थोडेफार नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
'निम्मा माने मागा संजू' कोण आहेत?
संजीव, 'निम्मा माने मागा संजू' या नावाने ओळखला जातो, त्यांच्या इंस्टाग्रामवर 2 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्याकडे अनेक महागड्या कार्स आहेत. तो स्वतःला शेतकरी सांगतो, परंतु तू त्याच्या राहणीमानावरून अनेक ते वाटत नाही. त्याच्या या लाइफस्टाइलमुळेच अनेक लोक त्याला ओळखतात.