
Suzlon Energy Share Pirce : सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही पवनचक्की निर्मिती कंपनी असून या कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांना धमाकेदार रिटर्न्स देणारा शेअर ठरला आहे. गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या शेअरची किंमत 2000% नी वाढली आहे. या वर्षाचे बोलायचे झाल्यास अवघ्या सहा महिन्यात या शेअरची किंमत67.13% नी वाढली आहे.
नक्की वाचा : अबब! 6861% टक्के रिटर्न्स!! या धमाकेदार शेअरमध्ये अजून गुंतवणुकीची संधी आहे ?
गेल्या तीन वर्षात सुझलॉनच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढताना दिसते आहे. गेल्या तीन वर्षांत हा शेअर 780 टक्क्यांनी वधारला आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास 28 फेब्रुवारी 2024 रोजी या शेअरची किंमत 49 रुपये होती जी 30 मे रोजी 71 रुपयांपर्यंत पोहोचली होती. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल उत्तम लागले असल्याने शेअरची किंमत आणखी वधारली. कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाल्यास या कंपनीला गेल्या वर्षी 254 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. यावर्षी हा फायदा 365 टक्क्यांनी वाढून 1182 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ब्लूमबर्गने कंपनीचा फायदा 456 कोटींपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्षात कंपनीला कैक पटीने अधिक फायदा झाला.
नक्की वाचा : रेपो रेट कपातीनंतर कर्जदारांना खूशखबर! या पाच बँकांची कर्जे झाली स्वस्त
कंपनीची ही कामगिरी पाहिल्यानंतर तज्ज्ञांनी या कंपनीचा शेअर खरेदी करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. 8 पैकी 6 बाजार विश्लेषकांनी या शेअर खरेदी करायलाच हवा असा सल्ला दिला आहे. यामध्ये Axis Capital, Investec, JM Financial, ICICI Securities आणि Motilal Oswal Securities यासारख्या ब्रोकरेज फर्मचा समावेश आहे. या शेअरची किंमत 83 रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाजही मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने वर्तवल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे.
सुझलॉन शेअरच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास 10 जून रोजी हा शेअर 67.83 रुपयांवर खुला झाला होता. 10 जूनला या शेअरने गाठलेली सर्वाधिक किंमत 68.50 रुपये इतकी होती. तर मंगळवारचा लो 66.80 रुपये इतका होता. या शेअरचा 52 विक लो 46.15 रुपये इतका असून 52 विक हाय 86.04 रुपये इतका आहे. कोणतीही गुंतवणूक करत असताना आपण गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनेच ती करावी ही सगळ्या वाचकांना विनंती. ही बातमी गुंतवणूकदारांना माहिती मिळावी या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world