TCS Q3 Result : एका शेअरमागे 77 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत नफा तब्बल 12 टक्क्यांची वाढला

TCS ने त्यांच्या शेअर धारकांना एका शेअरमागे एकूण 77 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे.  यामध्ये 10 रुपये प्रति शेअर अंतरीम डिव्हिडंड आणि 66 रुपये विशेष डिव्हिडंड असे मिळून 77 रुपयांचा हा डिव्हिडंड असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशातील नावाजलेली आणि तंत्र क्षेत्रातील  बडी कंपनी TCS ने FY25 म्हणजेच आर्थिक वर्ष 2025 साठीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टीसीएसने उत्पन्न, नफा, नफ्याची टक्केवारी या तीनही पातळ्यांवर वाढ झाल्याचे सांगितले आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीमध्ये टीसीएसच्या सगळ्या आर्थिक पातळ्यांवर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. TCS ने त्यांच्या शेअर धारकांना एका शेअरमागे एकूण 77 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे.  यामध्ये 10 रुपये प्रति शेअर अंतरीम डिव्हिडंड आणि 66 रुपये विशेष डिव्हिडंड असे मिळून 77 रुपयांचा हा डिव्हिडंड असणार आहे.  गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला झालेला नफा 11,955 कोटी इतका होता. यंदाच्या तिमाहीमध्ये टीसीएसला झालेला नफा 12,444 कोटींपर्यंत पोहोचला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीला झालेले एकूण उत्पन्नही वाढले आहे. गेल्या तिमाहीमध्ये उत्पन्न 64,259 कोटी रुपये इतके होते, जे या तिमाहीमध्ये 63,973 कोटी रुपये इतके झाले आहे. कंपनीच्या EBIT (कर आणि शुल्क वगळून उत्पन्न)  याशिवाय EBIT मार्जिनमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. EBIT (कर आणि शुल्क वगळून उत्पन्न)  हे गेल्या तिमाहीमध्ये 24.1 टक्के होतं जे यंदाच्या तिमाहीमध्ये 24.5 टक्के झाले आहे. 

नक्की वाचा : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा!

टीसीएसची कर्मचारी संख्या 5270 ने घटली आहे. याशिवाय युरोपातील व्यवसाय 1.5 टक्क्यांनी, उत्तर अमेरिकेतील व्यवसाय 2.3 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. मोठ्या डीलबाबत बोलायचे झाल्यास टीसीएसला 10.6 दशलक्ष डॉलर्सची मोठी डील मिळाली आहे. तिमाहीचे आकडे पाहिल्यास ही 18.6 %ची वाढ आहे तर वार्षिक पातळीवर ही वाढ 26 टक्के वाढ आहे. बँकींग, वित्त सेवा आणि विम्यामध्ये टीसीएसने वार्षित0.9% वाढ नोंदवली आहे. 

Topics mentioned in this article