किसान क्रेडिट कार्ड ते नैसर्गिक शेती! Budget 2024 मध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं?

Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 3.0 मधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील अन्नदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 3.0 मधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील अन्नदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी (Budget For Farmers) कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत पाहूया

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बजेटमधील शेतकऱ्यांसाठी तरतूद

- कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
- शेतकरी आणि त्यांच्या जमिनीला डिजिटल पब्लिक इंफ्राचा फायदा मिळणार
- 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टरवर आणण्यात येईल
- 5 राज्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड दिले जातील
- नैसर्गिक शेती वाढवण्यासाठी सरकारचा भर
- नैसर्गिक शेती योजना लागू करणाऱ्या ग्रामपंचायतींना चालना
- सरकार 32 पिकांसाठी 109 वाण लॉन्च करणार
- कृषी क्षेत्राची उत्पादकता ही सरकारची प्राथमिकता

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

अर्थसंकल्पातील इतर मोठ्या घोषणा

-  ग्रामीण आणि शहरी भागात 3 कोटी अतिरिक्त घरे
-  औद्योगिक कामगारांसाठी वसतिगृह-प्रकारच्या निवासासह भाड्याने घरे
-  शहरी गरिबांना घरे विकसित करण्यासाठी 10 लाख कोटी रुपये
-  मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज 
-  यापूर्वाचे कर्ज यशस्वीरित्या फेडलेल्यांना 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार
- 1 कोटी घरांवरील छतांवर सौर पॅनेलसाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना
- ‘ भारत स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर्स' उभारण्यासाठी सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी करणार