Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. यंदाच्या अर्थसंकल्पात 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, मोदी सरकारनं 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ही सवलत मिळणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले की विकसित भारताच्या दिशेनं सुरु असलेल्या आपल्या प्रवासात आम आदमींचं मोठं योगदान आहे. आता 12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लगणार नाही. म्हणजे तुम्ही गुंतवणूक केली असेल तर 12 लाखांपर्यंत तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.


( नक्की वाचा : Union Budget 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली )

तुमचे उत्पन्न 24 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 30 टक्के कर द्यावा लागेल. तसंच तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर 5 ते 8 लाखांवर 5 टक्के कर द्यावा लागेल. तसंच 4 लाखांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. 

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी भाषणात सांगितले की,  18 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांचे 70, 000 रुपये वाचणार आहेत. तर 25 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांचे 1.10 लाख रुपये वाचणार आहेत. आयटीआर आणि टीडीएसची मर्यादा वाढवण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांच्या कर सवलतीमध्येही वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Union Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प सादर! काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर... )
 

काय होणार बदल?

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार ज्या करदात्यांचे उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना आयकरामध्ये 100 टक्के सूट मिळेल. पण, ज्या करदात्याचं करयुक्त उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना सर्व टप्प्यांच्या टॅक्स द्यावा लागेल. 

या करदात्यांना 4 लाखांपर्यंत शून्य, 4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के, 8 ते 12 लाखांपर्यंत 10 टक्के, 12 ते 16 लाखांपर्यंत 15 टक्के, 16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के, 20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के तसंच 24 लाखांपेक्षा जास्त करयुक्त उत्पन्नावर 30 टक्क्यांपेक्षा जास्त कर लागणार आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article