UPI Payments : 1 एप्रिलपासून या मोबाइल नंबरवरुन UPI पेमेंट करता येणार नाही; तुमचा नंबर चेक करुन घ्या

UPI Mobile Number Update: सायबर फसवणूक आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे पाऊल उचलले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
UPI Payment Update

Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे यूपीआय अ‍ॅप्स वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. 1 एप्रिल 2025 पासून एक नवीन नियम लागू होणार आहे. बँक खात्यांशी जोडलेले मोबाईल जे फोन नंबर बराच काळ सक्रिय नसतील ते UPI सिस्टममधून काढून टाकले जाणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बँक खात्याशी ज्या युजर्सचे जुने किंवा बंद नंबर लिंक असतील त्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार आहे. जर तुम्ही जुना नंबर बँकेशी लिंक केला असेल, तर तुम्हाला UPI व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात.

सायबर फसवणूक आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे पाऊल उचलले आहे. बऱ्याच वेळा, मोबाईल नंबर बंद झाल्यानंतर, टेलिकॉम कंपन्या तो दुसऱ्या युजरला देतात. अशा परिस्थितीत, जुन्या क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यांवर फसवणूक होण्याचा धोका वाढतो. या कारणास्तव, NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला निष्क्रिय मोबाइल नंबर ओळखून ते त्यांच्या सिस्टममधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

(नक्की वाचा-  पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)

UPI पेमेंट कोणत्याही अडचणीशिवाय सुरू ठेवायचे असेल तर काय कराल? 

  • तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर तपासू घ्या. 
  • नंबर बंद असेल किंवा जुना असेल तर तो ताबडतोब अपडेट करा.
  • तुमच्या टेलिकॉम प्रोव्हायडरशी संपर्क साधा आणि तो नंबर अजूनही तुमच्या नावावर नोंदणीकृत आहे याची खात्री करा.
  • जर तुमचा नंबर बंद झाला असेल आणि दुसऱ्याला दिला गेला असेल, तर बँकेत जा आणि नवीन नंबर लिंक करून घ्या.
  • UPI अॅपवर जा आणि तुमचा नंबर आणि बँक तपशील अपडेट करा.

एनपीसीआयने सर्व बँका आणि यूपीआय अ‍ॅप्सना दर आठवड्याला निष्क्रिय क्रमांकांची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जर तुमचा नंबर बराच काळ सक्रिय नसेल तर तो बँकेच्या रेकॉर्डमधून आपोआप काढून टाकला जाऊ शकतो. म्हणून, तुमचा नंबर नेहमी सक्रिय आणि अपडेट ठेवा.

Advertisement

(नक्की वाचा- रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार)

तुमचा नंबर UPI साठी सक्रिय आहे की नाही, कसं तपासाल?

  • तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अ‍ॅपमध्ये लॉग इन करा आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर शोधा.
  • गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम वर जा आणि तिथे लिंक केलेला नंबर पडताळून पाहा.
  • जर नंबर बंद असेल तर नवीन नंबर लिंक करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा.
     
Topics mentioned in this article