Gold Price after Ceasefire:सोनं 4 लाखांपर्यंत जाणार? अमेरिका-इराण युद्धविराम होताच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ

अमेरिका-इराण युद्धविरामाची घोषणा होताच सोनं आणि चांदीचे दर पुन्हा भराभर वाढले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

US-Iran War Gold Prices : अमेरिका-इराण युद्धविरामाची घोषणा होताच सोनं आणि चांदीचे दर पुन्हा भराभर वाढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली आणि इराणच्या 10 कलमी तहाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. युद्धकाळात प्रचंड धास्तावलेल्या भांडवली बाजारानं युद्धविरामाची घोषणा होताच त्याचं जोरदार स्वागत केलं. भारतीय शेअर बाजार वधारला आणि भारतीय गुंतवणुकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला सोन्या-चांदीचे दरही वाढले आहेत.  

सोन्याऐवजी अमेरिकन ट्रेझरी बाँड्समध्ये गुंतवणूक

मंगळवारी सोन्याचा भाव 1,47,500 रुपये इतका होता. तो बुधवारी तीन हजार रुपयांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला, तर मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 2 लाख 37 हजार इतका होता. त्यामध्ये तब्बल १० हजारांची वाढ होऊन बुधवारी चांदीचा भाव 2 लाख 47 हजारांवर गेला. युद्ध शमलं तर सोन्या-चांदीचे दर पुढच्या काही काळात वाढत जाणार आहेत. जगात कधीही युद्ध सुरू झालं तरी सोन्याचे दर वाढतात. कारण सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. अमेरिका-इराण युद्धानं मात्र हा ट्रेंड बदलला होता. युद्धादरम्यान सोन्याचे भाव पडले होते.  तेलाच्या वाढत्या किमतींमुळे डॉलर जास्त मजबूत होण्याची शक्यता होती. युद्ध सुरू झाल्यावर पुढच्या काही दिवसांतच अमेरिकन डॉलरला बळकटी मिळाली. ट्रेझरी बाँडच्या वाढत्या उत्पन्नामुळे सोन्याच्या दरात चढउतार सुरू झाले. अमेरिकन 10 वर्षांच्या ट्रेझरी बाँड्सचा परतावा वाढून 4.11 % टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोन्याऐवजी अमेरिकन ट्रेझरी बाँड्समध्ये गुंतवणूक सुरू केली. या काळात जगभरातल्या बँकांनी सोन्याची विक्री करायला सुरुवात केली. बँकांनी धोरणात्मक निर्णय घेऊन सोनं विकून चलन मजबूत करण्यावर भर दिला. या सगळ्याचा परिणाम म्हणून युद्धादरम्यान सोन्याच्या किमतीमध्ये फार फरक पडला नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Share Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 2615 अंकांनी तर निफ्टीत 774 अंकांची वाढ

सोनं अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता...

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती वाढलेल्याच आहेत. सोनं आणखी किती वाढू शकतं, त्याच्याबद्दलचा अंदाज काही सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या अंदाजानुसार, पुढच्या काही काळात सोन्याचे भाव अडीच लाखांपर्यंतही जाऊ शकतात. तर चांदीचे भाव किलोमागे १२ लाखांपर्यंतही जाऊ शकतात. पुढच्या काही काळात सोन्याचे भाव अडीच लाख ते चार लाखांपर्यंतही जाऊ शकतात. तर चांदीचे भाव किलोमागे १२ लाखांपर्यंतही जाऊ शकतात. ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री इराणची संपूर्ण लोकसंस्कृती नष्ट होईल, असा हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अमेरिका-इस्रायल मंगळवारी रात्री इराणवर सर्वात मोठा हल्ला करतील, अशी शक्यता होती. इराणवर अणुबॉम्बचा प्रयोग होऊ शकतो, या भीतीनं जग धास्तावलं होतं. तसं झालं असतं तर जगभरातले सगळे बाजार कोसळले असते. मात्र युद्धविरामामुळे गुंतवणुकदारांचा जीव भांड्यात पडला. युद्धाच्या संपूर्ण काळात जगभरातल्या बाजारांमध्ये मोठी पडझड झाली. आता बाजार सावरतील आणि पुन्हा वर जातील, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या पंधरा दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पंधरा दिवसानंतर अमेरिका-इराण काय निर्णय घेतात. त्या निर्णयानंतरच बाजारात खऱ्या अर्थानं स्थिरता येऊ शकेल. तोपर्यंत गुंतवणुकदारांसाठी वेट अँड वॉच हेच हिताचं राहील.