One Nation, One Gold Rate : सोनं होणार स्वस्त! संपूर्ण देशभर असणार एकच भाव? काय आहे नवं धोरण?

One Nation One Gold Rate : देशभरात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार याबाबत वन नेशन, वन गोल्ड रेट (One Nation, One Gold Rate) हे धोरण आणण्याच्या विचारात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
O
मुंबई:

One Nation One Gold Rate : केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के कमी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी केली. अर्थमंत्र्यांच्या घोषणांचे पडसाद सराफा बाजारात उमटले. मुंबईमध्ये बजेटनंतर काही तासांमध्येच सोन्याचे दर प्रति तोळा 3 हजारांनी कमी झाले. राज्यातील अन्य शहरांमध्येही सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली होती. देशभरात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार याबाबत वन नेशन, वन गोल्ड रेट (One Nation, One Gold Rate) हे धोरण आणण्याच्या विचारात आहे.
 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सोन्याचे दर वेगळे का?

कर, स्थानिक बाजारातील मागणी, मजुरीचे दर, सरकारी धोरणं, दळणवळण यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येक शहरात आणि राज्यात सोन्याचे दर हे वेगळे असतात. कमी टॅक्स आणि अधिक मागणी असलेल्या बाजारपेठीतील सोन्याचे दर हे अधिक टॅक्स आणि कमी मागणी असलेल्या बाजारपेठेपेक्षा कमी असतात.  

सोन्याच्या दरात पारदर्शकता असावी या उद्देशानं देशभरात सोन्याचे दर एकच (ONOR) असावे असा प्रयत्न केला जात आहे.  देशातील आघाडीच्या ज्वेलर्सचा समावेश असलेल्या जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनं (GJC) या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. या कौन्सिलच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

( नक्की वाचा : तुम्ही किती सोनं घरी ठेवू शकता? विक्रीनंतर टॅक्स लागतो का? वाचा नियम )
 

काय होणार फायदा?

सध्या देशभर सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. त्यामधील तफावत दूर करणे आणि हा व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी देशभरात एकच दर निश्चित करण्याचं धोरण लागू करण्याचा विचार आहे. स्थानिक परिस्थिती आणि बाजरांमधील ट्रेंड याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतो. प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगळे असल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असतं. नव्या धोरणामुळे हा संभ्रम दूर होईल.

Advertisement

ज्वेलरी उद्योग जीएसटी, हॉलमार्क सारख्या उपायांमुळे अधिक पारदर्शक बनत आहे. ग्राहकांची सोनं खरेदीमध्ये होणारी फसवणूक टाळणे हा या उपायांचा उद्देश आहे. संपूर्ण देशभरात समान दर ही या उपाययोजनांमधील पुढची पायरी मानली जात आहे.

'एक देश, एक दर' धोरण लागू झाल्यानं सराफा बाजारातील अनिश्चितता कमी होईल. सोन्याचे भाव स्थिर झाल्यानं ग्राहकांना निश्चिंतपणे सोनं खरेदी करता येईल. भारतीयांच्या आयुष्यात सोन्याला खास स्थान आहे. आपल्यासाठी सोनं हा फक्त दागिना नाही. त्यांच्यासाठी सोनं ही आयुष्यभराची ठेव असते.

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

देशभर एक दर लागू झाल्यानं गुंतवणूक दारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे सोन्याच्या बाजारातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढेल. त्याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांना होऊन सोन्याचे दर आणखी कमी होतील, अशी आशा आहे. 
 

Advertisement