कर्ज मिळणं होणार सोपं, काय आहे रिझर्व्ह बँकेची क्रांतीकारी ULI पद्धत?

Unified Lending Interface : कर्ज मिळवण्याची गुंतागुतीची प्रक्रिया सोपी करणारी युनिफाइड लेंडिंग इंटरफेस पद्धत रिझर्व्ह बँक लवकरच सुरु करणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यूनिफाइड पेमेंट  इंटरफेस (Unified Payments Interface) नंतर आता युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (Unified Lending Interface) सुरु करण्याची तयारी करत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच याची घोषणा केली. आरबीआयनं यूएलआयचा (ULI) पायलट प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या अनुभवाच्या आधारे योग्यवेळी यूएलआय सिस्टम लॉन्च करण्यात येईल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रिझर्व्ह बँकेनं सुरु केलेली यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) पद्धत गेमचेंजर ठरली आहे. UPI मुळे देशभरात पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. सुट्टे पैसे देण्यापासून ते मोठी रक्कम अदा करण्यापर्यंतचे सर्व पैशांचे व्यवहार आता यूपीआयच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर होतात. यूएलआय देखील याचप्रकारे गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कृषी तसंच लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे.

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )
 

काय आहे ULI ?

बँकिग व्यवहारातील डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून गेल्या वर्षी हा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला होता. या माध्यमातून वेवेगळ्या राज्यातील जमिनींच्या नोंदीसह कर्जदात्याची वेगवेगळी डिजिटल माहिती त्याच्या परवानगीसह कर्ज देणाऱ्या संस्थेला दिली जाईल. त्यामुळे कर्ज देणाऱ्यांना कर्ज घेणाऱ्यांची कुवत तसंच परतफेडीची क्षमता समजणे सोपे होईल.

( नक्की वाचा : ITR Refund: तुमचा टॅक्स रिफंड कधी येणार? वाचा कोणत्या ITR फॉर्ममुळे मिळते जलद रक्कम )
 

वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीशी जोडण्यासाठी 'प्लग अँड प्ले'  पद्धत राबवण्यात येईल. त्यामुळे यामधील तांत्रिक प्रक्रिया जलद गतीनं होईल.  लहान आणि ग्रामीण क्षेत्रातील लोकांना कर्ज देण्यासाठी लागणारा वेळ या पद्धतीनं कमी होईल.  

Advertisement

कृषी तसंच लघू आणि मध्यम उद्योगांची असलेली कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी ही ULI उपयोगी ठरेल, असा विश्वास शक्तीकांत दास यांनी व्यक्त केलाय. 

Topics mentioned in this article