गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर कुठे? ही छोटी बँक सर्वात पुढे

कमी व्याजदरात गृहकर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्त शोधाशोध करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, जे कमी व्याजदरावर गृहकर्ज देतील. 

जाहिरात
Read Time: 2 mins

कमी व्याजदरात गृहकर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्त शोधाशोध करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, जे कमी व्याजदरावर गृहकर्ज देतील. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने सातव्यांदा व्याजदरात कोणताही बदल न करता सद्यस्थिती कायम ठेवली. आरबीआय व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. मात्र यामध्ये केव्हा बदल होतील, हे सांगणं कठीण आहे. व्याजदर कमी केल्यानंतर एफडीवर कमी व्याज मिळेल तर दुसरीकडे बँकांकडून स्वस्त कर्ज मिळू शकेल. मात्र सद्यपरिस्थितीतही तुम्ही कमी व्याजावर गृहकर्ज घेऊ इच्छित असाल तर आम्ही अशा सरकारी आणि खासगी बँकांबद्दल सांगणार आहोत. या बँकांमध्ये स्वस्त व्याजदरावर गृहकर्ज मिळू शकेल. 

BankBazaar.com च्या डेटानुसार, देशात 15 अशा बँका आहेत, ज्या 20 वर्षांसाठी 75 लाखांचं गृहकर्ज 9.4 टक्क्यांपेक्षा कमी व्याजावर ऑफर करतात. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि आयडीबीआय बणँकेत गृहकर्जावर व्याजदर 8.4 टक्क्यांपासून सुरू होतं. कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्जावर व्याजदर 8.5 टक्क्यांपासून सुरू होतं. अशात 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी EMI 64,650 रुपयांपर्यंत जाईल. 

तर कोटक महिंद्र बँकेत इंटरेस्ट रेट 8.7 टक्के, ICICI बँकेत 9 टक्क्यांपासून सुरू होते. तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेत गृहकर्जावर व्याजदर 9.15 टक्के, तर सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेत गृहकर्जावर व्याजदर 9.4 टक्क्यांपासून सुरू होत आहे.     
 

Advertisement