
Avadhut Sathe News : शेअर बाजारातील ‘फिनफ्लूएन्सर' (Finfluencer) म्हणून ओळखले जाणारे अवधूत साठे हे बाजार नियामक संस्था असलेल्या 'सेबी'च्या (SEBI) रडारवर असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा यांना पाहिलं असेल. शेअर बाजारात आवड असणारे यांच्या युट्यूब चॅनलला फॉलोही करत असतील. अवधून साठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो तरुणांना आर्थिक शिक्षित केल्याचं सांगितलं जातं. मूळचे मराठी असलेले अवधून साठे यांच्याविरोधात सेबीकडून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सेबीमध्ये नोंदणी (Avadhut Sathe Sebi Action) न करता आर्थिक सल्ला दिल्याच्या आरोपावरून सेबीने त्यांच्याविरोधात शोध मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे यांनी अनधिकृत आर्थिक सल्ल्यातून 400 ते 500 कोटी रुपयांची अनियमित व्यवहार झाल्याचा संशय आहे.
कोण आहेत अवधूत साठे? l Who is Avadhut Sathe
अवधूत साठे हे प्रसिद्ध मार्केट ‘फिनफ्लुएन्सर' आणि ट्रेडिंग गुरू आहेत. त्यांचा फोकस रिलेट गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंगबाबत माहिती देण्यावर राहिला आहे. सोशल मीडिया चॅनल आणि Karjat Trading Academy च्या माध्यमातून तज्ज्ञ म्हणून ते समोर आले आहेत. लाखो युजर्स त्यांच्या ट्रेडिंग क्लासशी जोडले गेले आहेत. साठे यांचं युट्यूब चॅनलही आहे. त्यांचं चॅनल आतापर्यंत 9,36,000 सबस्क्राबरपर्यंत पोहोचलं आहे. सध्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने(SEBI) फिनफ्लुएन्सर अवधूत साठेंविरुद्ध मोठी शोध मोहीम राबवली आहे.
अवधूत साठेंवर काय आहेत आरोप?
* नियमबाह्य पद्धतीने शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील सल्ले दिल्याचा संशय
* या गुंतवणूक सल्ल्यातून 400-500 कोटींचे व्यवहार झाल्याचा अंदाज
* सेबीने अवधूत साठे यांच्याविरोधात राबवली तपासणी मोहीम
* अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर
अवधूत साठे यांची नेटवर्थ किती? l avadhut sathe net worth
रेडिट डॉट कॉमवर आलेल्या माहितीनुसार, अवधूत साठे हे ट्रेनिंग अकॅडमेतून मोठी कमाई करीत आहेत. २०२३ मध्ये त्यांची नेटवर्थ ८६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. २०२१ मध्ये त्यांची नेटवर्थ १७ कोटी, २०२२ मध्ये ३७ कोटी इतकी होती.
अवधूत साठेंविरोधात शोधमोहीम
NDTV प्रॉफिटने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधात आदेश जारी करण्याऐवजी थेट त्यांच्याविरोधात शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. सेबीचे पूर्ण-वेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनीही नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईतील एका मोठ्या 'फिनफ्लुएन्सर'च्या विरोधात मोठी कारवाई केल्याचे सांगितले होते.
कमलेश वार्ष्णेय यांनी स्पष्ट केले की, "सेबी सामान्यतः वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करत नाही, परंतु ही कारवाई शेअर बाजार शिस्त मजबूत करण्याच्या त्यांच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. वार्ष्णेय यांनी म्हटलं की, “आम्ही या उद्योगातील एका मोठ्या नावावर मोठी शोधमोहीम राबवली आहे. कारवाई महसूल गोळा करण्यासाठी नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश देण्यासाठी आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world