Who is Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला! टाटा ट्रस्टच्या नव्या संचालकांबाबत वाचा सर्व माहिती

Noel Tata : टाटा समुहानं रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला आहे. टाटा ट्रस्टच्या शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Who is Noel Tata : टाटा समुहानं रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला आहे. टाटा ट्रस्टच्या शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रोजी झालेल्या बैठकीत नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांचे वडिल नवल टाटा यांनी दोन लग्न केले होते. नवल टाटा यांनी दुसरं लग्न सिमोन टाटा यांच्याशी केलं. नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे नोएल टाटा हे अपत्य आहेत.  

नोए टाटा अनेक कंपन्यांचे प्रमुख आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळातील सदस्यही होते. टाटा स्टील आणि टायटन या घड्याळ कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या आई सिमोन टाटा या मुळच्या फ्रेंच-स्विस कॅथलिक आहेत. त्या सध्या ट्रेंट, व्होल्टा, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा इंटरनॅशनलच्या संचालक आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी आहे टाटा समुहाची रचना?

रतन टाटा यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडला नव्हता. त्यामध्ये त्यांच्या ट्रस्टमधील एका सदस्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार होती. टाटा समुहाचे दोन मुख्य ट्रस्ट आहेत. सर दोराबजी ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट. या दोन ट्रस्टचा टाटा समुहाची मुळ कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये 52 टक्के वाटा आहे. टाटा सन्सकडून समुहातील सर्व कंपनींचं नियमन केलं जातं. दोन्ही ट्रस्टमध्ये एकूण 13 ट्रस्ट आहेत. माजी संरक्षण सचिव विजय सिंह, ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज वेणू श्रीनिवासन, व्यावसायिक मेहली मिस्त्री आणि वकील डेरियस खंबाटा हे दोन्ही ट्रस्टचे सदस्य आहेत. 

( नक्की वाचा :  Ratan Tata Family : 2 BHK मध्ये राहणाऱ्या रतन टाटांच्या सख्ख्या भावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? )

काय आहे परंपरा?

पारशी व्यक्तींनीच आत्तापर्यंत टाटा ट्रस्टचं अध्यक्षपद स्विकारल्याची परंपरा आहे. त्यामधील काही जणांचं आडनाव टाटा नव्हतं. तसंच त्यांचं ट्रस्टच्या संस्थापक कुटुंबांशी थेट नातं नव्हतं. नवे संचालक नोएल टाटा सर दोराबजी ट्रस्टचे 11 वे तर सर रतन टाटा ट्रस्टचे सहावे अध्यक्ष आहेत. ते गेल्या चार दशकांपासून टाटा समुहाशी संबंधित आहेत. 

( नक्की वाचा : Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय )

मुलांना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

नोएल टाटांच्या तीन मुलांना या वर्षाच्या सुरुवातीला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांना पाच चॅरिटी संस्थांचे प्रमुख बनवण्यात आले आहे. नोएल टाटा यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. लीआ, माया और नेविल ही त्यांच्या मुलांची नावं आहेत. या तिघांनाही सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि  सर रतन टाटा ट्रस्टमधील पाच ट्रस्टचे सदस्य बनवण्यात आलं होतं. रतन टाटा यांनी त्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली होती. या तिघांनी यापूर्वीही टाटा समुहातील महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. 
 

Topics mentioned in this article