जाहिरात

Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय

Ratan Tata's Top Decisions: रतन टाटांच्या नेतृत्त्वामध्ये टाटा समुहानं नवी भरारी घेतली. मीठ ते सॉफ्टेवेअरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात टाटा ग्रुप भारत-केंद्रित युनिटच्या माध्यमातून जागतिक उद्योगांच्या केंद्रस्थानी पोहोचला.

Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय
Ratan Tata : रतन टाटा यांनी 1991 ते 2012 पर्यंत सलग 21 वर्ष टाटा ग्रुपचं नेतृत्त्व केलं. (Source - AI by Canva)
मुंबई:

देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) आजारपणामुळे निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांनी 1991 ते 2012 पर्यंत सलग 21 वर्ष टाटा ग्रुपचं नेतृत्त्व केलं. रतन टाटांच्या नेतृत्त्वामध्ये टाटा समुहानं नवी भरारी घेतली. मीठ ते सॉफ्टेवेअरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात टाटा ग्रुप भारत-केंद्रित युनिटच्या माध्यमातून जागतिक उद्योगांच्या केंद्रस्थानी पोहोचला.  

टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे संचालक म्हणून रतन टाटा यांनी अनेक मोठे व्यावसायिक निर्णय घेतले. त्यामुळे टाटा ग्रुपच्या विकासाचा नवा अध्याय सुरु झाला. त्यांचे 5 महत्त्वाचे निर्णय पाहूया

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

JLR चे अधिग्रहण

रतन टाटा यांच्या नेतृत्त्वामध्ये टाटा समूहानं लग्झरी कार बनवणाऱ्या जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover)  कंपनीला अधिकग्रहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या कंपनीचा ब्रिटनमधील ऑटोमोबाइल इंडस्‍ट्रीमध्ये मोठा दबदबा होता. 

टाटा मोटार्सनं या कंपनीला 2.3 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केलं होतं. 2024 मधील आर्थिक वर्षात JLR कंपनीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधित 29 अब्ज पाऊंड महसूल मिळवला. तर कंपनीचा नेट प्रॉफिट जवळपास 2.6 अब्ज पाऊंड होता. 

Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

( नक्की वाचा :  रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? )

एक लाखांची नॅनो

सामान्य लोकांना परवडेल अशी कार तयार करणे हे रतन टाटांचे स्वप्न होते. त्या स्वप्नातूनच टाटा यांनी नॅनो प्रोजेक्टला सुरुवात केली. 2008 साली फक्त 1 लाख रुपयांमधील या मिनी कारचं अनावरण करण्यात आलं. 

छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तयार करण्यात आलेल्या नॅनो कारला तितकं यश मिळालं नाही. 2012 साली 74,527 नॅनो कारची विक्री झाली होती. पण, त्यानंतर नॅनोची विक्री कमी झाली. 2018 साली कंपनीनं नॅनो कार बंद करण्याचा निर्णय घेतला. 

टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश

रतन टाटा यांच्या नेतृत्त्वामध्येच टाटा समूहानं घरगुती टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केला. टाटा टेलिसर्व्हिसेसन जपानी टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख NTT डोकोमोच्या सहकार्यानं नोव्हेंबर 2008 साली टाटा डोकोमो (Tata Docomo) लॉन्च केले. 

टाटा डोकोमोनं कमी कालावधीमध्ये भारतीय बाजारात स्थान निर्माण केलं होतं. नोव्हेंबर 2010 मध्ये ती 3 G सेवा देणारी देशातील पहिली प्रायव्हेट कंपनी बनली. पण, सतत होत असलेल्या तोट्यामुळे 2014 साली NTT डोकोमोनं यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2017 पर्यंत या कंपनीचं काम बंद झाला. हा संपूर्ण व्यवसाय भारती एअरटेलनं टेक ओव्हर केला. 

Ratan Tata demise : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार?  कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी?

( नक्की वाचा : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार? कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी? )

संरक्षण क्षेत्रात मोठं काम

रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा सन्सनं 'एयरोस्पेस आणि डिफेन्स सोल्यशुन व्यवसायात पाय रोवले. त्यांना टाटा टाटा एडवांस्ड सिस्टम्स (TASL) ची सुरुवात केली. 2007 साली TSAL देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणारी पहिली खासगी कंपनी बनली. 

TASL नं 2024 मधील आर्थिक वर्षात 342 कोटी रुपये महसूल कमावला. या कंपनीनं नुकताच अमेरिकेतील एयरोस्पेस प्रमुख लॉकहीड मार्टिनसोबत भागिदारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

एअर इंडियाची घरवापसी

टाटा ग्रुपनं सुरु केलेली एअरलाईन्स पुन्हा एकदा टाटांची बनली आहे. 2021 साली एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडं आली. त्यावेळी रतन टाटा, टाटा सन्सचे मानद संचालक म्हणून कार्यरत होते. तोट्यातील एअरलाईन्सला टाटांनी 18,000 कोटींमध्ये खरेदी केले.

ही कंपनी अधिग्रहण केल्यानंतर एअर इंडियाला सुरुवातीच्या वर्षातील ओळख आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याची संधी टाटा समुहाकडं आहे, असं रतन टाटा यांनी सांगितलं होतं. 2024 मधील आर्थिक वर्षात एअर इंडियानं कंपनीचा तोटा 60 टक्के कमी केला असून तो 4,444 कोटींपर्यंत आणला आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
रतन टाटांना 'नॅनो' कारची संकल्पना कशी सुचली? नॅनोच्या निर्मिती मागची कहाणी
Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय
ratan-tata-old-interview-when-somebody-asked-how-you-avoid-corruption
Next Article
Ratan Tata : जेव्हा रतन टाटांना मिळाला होता लाच देण्याचा सल्ला, सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे उत्तर