X ची साफसफाई, 53 लाख खाती बंद केली

यापूर्वी X ने पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध करण्याऐवजी एक ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये म्हटले होते की,  2022 सालच्या पहिल्या सहामाहीत X च्या धोरणांचा भंग करणाऱ्या 6.5 दशलक्ष पोस्ट आढळल्या होत्या.

Advertisement
Read Time: 2 mins

X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरने  बऱ्याच काळानंतर पारदर्शकता अहवाल जारी केला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचे नामकरण 'X' असे केले होते. नामांतर झाल्यानंतर सादर करण्यात आलेला हा पहिला पारदर्शकता अहवाल आहे. या अहवालात कंपनीने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा तपशील दिला आहे. जानेवारी ते जून 2024 दरम्यान, X ने लाखो खाती बंद केली आहेत तर कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत.  या अहवालानुसार, X ने जानेवारी ते जून 2024 या सहा महिन्यांत जवळपास 52.9 लाख खाती बंद केली आहेत तर सुमारे 1.06 कोटी पोस्ट ,संवेदनशील म्हणून जाहीर केल्यात किंवा डिलीट केल्या आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यापूर्वी X ने पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध करण्याऐवजी एक ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये म्हटले होते की,  2022 सालच्या पहिल्या सहामाहीत X च्या धोरणांचा भंग करणाऱ्या 6.5 दशलक्ष पोस्ट आढळल्या होत्या. 2021 च्या तुलनेत 2022मध्ये अशा पोस्टमध्ये 29% वाढ झाली होती. 2022 साली  16 लाख खाती बंद करण्यात आली होती.  

नक्की वाचा : फ्लिपकार्टवर iPhone15 ची किंमत पाहून तुम्हाला धक्काच बसेल

X ने पारदर्शकता अहवालात म्हटले आहे की असभ्य वर्तन, छळवणुकीचे प्रकार दिसून आलेली 11 लाखांपेक्षा अधिक खाती बंद करण्यात आलीतर अशा प्रकारच्या 26.48 लाख पोस्ट डिलीट करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. बेकायदेशीर वस्तू आणि सेवांशी निगडीत तक्रारींनंतर 5.14 लाख खाती बंद करण्यात आली तर 5.49 लाख पोस्ट डिलीट करण्यात आल्या. 

नक्की वाचा : लग्नसराई आधी सोन्याचे भाव आभाळाला, पहिल्यांदाच ओलांडला...

बालसुरक्षा, अश्लीलता, विखारी विधाने, हिंसक मजकूर, दिशाभूल करणाऱ्या बाबी X वर प्रतिबंधित आहेत. असे असतानाही अशा स्वरुपाच्या पोस्ट करणाऱ्या खात्यांवर कारवाई करण्यात आली. अशी लाखो अकाऊंट बंद करण्यात आली असून या पोस्टही हटविण्यात आल्या आहेत. X वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कंपनीने आपल्या नियमांची पुन्हा तपासणी केली आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. X चा वापर करून खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, बेकायदेशीर, आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबतची माहिती देणाऱ्या सगळ्यात जास्त पोस्ट युरोपियन महासंघातून आल्या आहेत. ज्यातील 56 टक्के प्रकरणांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. 

ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे आल्यापासून याबाबत नवनवे वाद सातत्याने निर्माण होत राहिले आहेत. मस्क यांच्या व्यंगात्मक पद्धतीने टीका करणाऱ्या पोस्टचीही चर्चा होत असते. ट्विटरकडे गंभीर चर्चेसाठीचे माध्यम म्हणून पाहिले जात होते, आता ट्विटरची ही छबी धुळीस मिळाल्याचा मस्क यांच्यावर आरोप केला जातो. X वरून विविध देशांमध्येही वाद निर्माण झाले आहेत. ब्राझीलमध्ये तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यामुळे Xवर बंदी घालण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article