
दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होईल. त्यावेळी सोन्या चांदीच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र त्या आधीच सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव तर गगनाला भिडला आहे. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात 700 रुपयांची तर चांदीच्या भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोनं कसं खरेदी करायचं अशी चिंता आता लागून राहीली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव सुवर्णनगरीत आज बुधवारी सोन्याचे भाव 75 हजार 700 रुपयांवर आहेत. तर चांदीचे भाव 92 हजार रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आठ दिवसात सोन्याच्या भावात 3 हजारांची तर चांदीच्या भावात तब्बल आठ हजार रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 75 हजार 700 रुपयांवर आहे. जीएसटी सह सोन्याचे भाव 77 हजार 900 रुपयांवर गेला आहे. तर चांदीचे भाव 92 हजार रुपयांवर जीएसटी सह चांदीचे भाव 94 हजार 700 रुपयांवर गेला आहे.
भारतात पहिल्यादाच सोन्याचा दर प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅमला 76,000 रुपयांवर गेला आहे. या आधी सोन्याला प्रति तोळा इतका भाव कधीच नव्हता. हा दर मुंबई, जळगावसह, दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि चंडीगढ़ या शहरातही येवढाच आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात लग्नाचे मुहुर्त असतात. यावेळी सोन खरेदी तेजीत असता. अशा वेळी सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे काही जण सोने खरेदी बाबत वेट अँण्ड वॉचचही भूमीका घेताना दिसत आहे.
दरम्यान येणाऱ्या काळात सोन्या चांदीचे दर कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण गेल्या काही महिन्यात पाहीले असता सोन्या चांदीच्या दरात घट होण्या पेक्षा सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढे दर वाढणार की कमी होणार हा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते ही वाढ होतच राहील. सोन्याचे दर ज 79,000 रुपये से 80,000 रुपये प्रति तोळा जावू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world