Young Entrepreneurs Success Story: स्वप्न तर सर्वच पाहतात, पण ती स्वप्नं सत्यात उतरवून दाखवणे प्रत्येकालाच शक्य नसते. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत वयाच्या 25 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा करणे ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नाही, पण अशक्यही नाही. 25 वर्षांच्या झैद खान यांनी असा दावा केला आहे की, वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच त्यांनी 5 कोटी रुपयांची नेट वर्थ उभारली होती. झैद खान डिजिटल ब्रँडिंग एजन्सी 'झेडिटल मीडिया'चे (Zedital Media) संस्थापक आहेत. त्यांच्या या प्रवासातून आता तरुण प्रेरणा घेत आहेत. नुकतेच श्रेया हेगडे यांच्या 'द करोड क्लब' (The Crore Club) या पॉडकास्टमध्ये बोलताना झैद यांनी आपल्या यशाची कहाणी मांडली. पैसे कमवायला सुरुवात करण्यासाठी खूप मोठ्या आयडियाची गरज नसते, तर हिंमतीची गरज असते; असा सल्ला त्यांनी दिला.
काही ना काही विकायला सुरुवात करा (Start Selling Something Today)
झैद यांनी आपल्या यशाचा सर्वात मोठा मंत्र सांगताना दोन गोष्टींवर भर दिला. पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, 'जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर काही ना काही विकायला सुरुवात करा. मग ते तुमचे कोणते कौशल्य (स्किल) असो, सल्ला असो किंवा एखादी सेवा असो. सुरुवातीला त्यासाठी तुम्हाला 100 किंवा 200 रुपयेच का मिळेना, पण यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.' झैद यांच्या मते, जेव्हा तुमच्या खिशात तुमच्या कष्टाचा पहिला 100 रुपया येतो, तेव्हा तुमचा आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. याशिवाय इंटरनेटच्या ताकदीवर भर देत ते म्हणतात की, 'जर तुम्ही ऑनलाइन सक्रिय नसाल तर आजच्या जगात तुमचे कोणासाठी काही अस्तित्वच नाही. कंटेंट हीच खरी डिजिटल करन्सी आहे.'
डॉक्टर बनण्याचे स्वप्न आणि IIM पर्यंतचा प्रवास (Journey From NEET Aspirant to IIM Bengaluru)
झैद यांनी आपल्या शिक्षणाबाबतही सांगितले की, त्यांना वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात जायचे होते आणि NEET परीक्षेची तयारी करण्याचा त्यांचा विचार होता. 'मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, सर्वांनी मला डॉक्टर बनण्यास सांगितले आणि मी ऐकलेला दुसरा सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता किंवा MBBS करू शकता', पण जेव्हा त्यांनी युट्यूब चॅनेल्ससोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा मार्ग बदलला.
(नक्की वाचा : EPFO New Portal: जुन्या बंद PF खात्यांचे पैसे काढायचे आहेत? केंद्र सरकारची मोठी घोषणा, जाणून घ्या एका क्लिकवर)
त्यांनी पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. लवकरच आर्थिक यश मिळवूनही, खान यांनी वर्ष 2024 च्या शेवटी आयआयएम बंगळुरूच्या (IIM Bengaluru) एमबीए (MBA) प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. त्यांचे म्हणणे आहे की, 'ते व्यवसाय तर चालवत होते पण पुस्तकं आणि सिद्धांतांच्या (थिअरी) समजण्यात थोडे मागे होते, त्यामुळे ते वर्गात जे काही शिकतात, ते लगेच आपल्या व्यवसायात लागू करतात.'