King Cobra Rescue Video: मंगळवारी ५ मे रोजी एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. १२ फूट लांब विषारी किंग कोब्रा थेट गावातील एका चिकनच्या दुकानात घुसला. इतका विशाल आणि धोकादायक साप पाहून परिसरात खळबळ उडाली. दुकानाचा मालक आणि जवळपासचे लोक दहशतीत आले आहेत. किंग कोब्राबाबत सूचना मिळताच वन विभाग आणि स्नेक हेल्पलाइनची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी किंग कोब्राला रेस्क्यू केलं असून जंगलात सुरक्षितपणे सोडलं आहे.
चिकनच्या दुकानात १२ फूट लांब कोब्रा...
ही घटना ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. येथील कप्तिपडा भागातील एका गावातील आहे. मंगळवारी अचानक एका चिकनच्या दुकानात १२ फूट लांब किंग कोब्रा दिसला. दुकानातील लाकड्यांच्या मोळीजवळ हा साप लपला होता. भला मोठा साप पाहताच दुकानदार घाबरला, त्याने तातडीने वनविभागाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.
अन्नाच्या शोधात गावापर्यंत पोहोचला कोब्रा...
स्नेक हेल्मलाइन टीमसोबत वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीमने किंग कोबराला पकडताना प्रचंड अलर्ट होती. वन अधिकारी आणि स्नेक हेल्पलाइननुसार, किंग कोब्रा अन्नाच्या शोधात जंगलातून गावी आला. शिकारीच्या शोधात तो चिकन शॉपर्यंत पोहोचला असावा आणि दुकानात लपून बसला. रेस्क्यू केल्यानंतर किंग कोब्राला सिमिलिपालच्या घनदाट जंगलात सोडण्यात आलं. सिमिलिपाल टायगर रिझर्व्ह आपले विशाल जंगल आणि जैव विविधतेसाठी ओळखलं जातं.