Placement drive in IITs : देशातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षण संस्था आयआयटीमध्ये प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू होताच एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक आयआयटीने २० हून अधिक कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या कंपन्यांनी आयआयटी विद्यार्थ्यांना कोटींची ऑफर दिली, मात्र प्रत्यक्षात त्यांना रुजू करून घेतलं नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे.
आयआयटी प्लेसमेंटच्या नियमानुसार, एक ऑफर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत देण्याची परवानगी नसते. त्यातच अनेक कंपन्यांना जॉइनिंगच्या दोन दिवसांपूर्वी नोकरीची ऑफर रद्द केली होती. अशात शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी धावाधाव करावी लागते. त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. शेवटच्या क्षणी हातातील नोकरी गेल्यामुळे करिअर धोक्यात असल्याची भावना निर्माण होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयआयटीचा निर्णय...
आयआयटी प्रशासनाने ही गंभीर समस्या पाहता एकता दाखवला आणि सर्वांच्या संमतीने कठोर पाऊलं उचलली. आयआयटी आपल्या विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात घालू शकत नाही, आणि असं करणाऱ्यांना सहन करणार नाही. २० कंपन्यांवरील बंदी केवळ सध्याच्या प्लेसमेंट सीजनसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र याचा थेट परिणाम कॉर्पोरेट जगतावर स्पष्टपणे दिसून येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना दिलेलं नोकरीचं वचन तोडणं त्यांना महागात पडू शकतं. यापुढे कंपन्यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांना धोका देणं महागात पडू शकतं.
नक्की वाचा - Loan EMI : कर्जदारांसाठी खुशखबर! लोनचा EMI कमी होण्याची शक्यता; दरमाह किती पैसे वाचणार?
२० हून जास्त कंपन्यांवर प्रतिबंध...
आयआयटीमध्ये सध्याच्या प्लेसमेंट सीजनमध्ये २० हून अधिक कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ज्या कंपन्यांनी गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर रद्द केली, त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. बंदी आणलेल्या कंपन्यांमध्ये अधिकांश डेटा अॅनलिटिक्स आणि सॉफ्टवेअरवर आधारित फर्म आहेत. आयआयटीच्या अधिकाऱ्यांनुसार, बंदी आणलेल्या कंपन्यांची यादी साधारण १५ आयआयटीच्या प्लेसमेंट कोऑर्डिनेटरने क्रॉस चेक केलं आहे. या कंपन्यांनी एकाहून अधिक आयआयटीमधील ऑफर रद्द केले होते.
आयआटीने विद्यार्थ्यांच्या करिअरमधील धोका आणि मानसिक आरोग्याचा विचार करून घेतला आहे. अनेक आयआयटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे आधीच नोकरीची ऑफर होती, त्यांना पुढील प्लेसमेंट मुलाखतीत बसण्याची परवानगी नसते. मात्र शेवटच्या क्षणी जर ही ऑफर रद्द झाली तर विद्यार्थ्याकडे दुसरा पर्याय शोधायला वेळ मिळत नाही. प्लेसमेंट अधिकाऱ्यांनी कंपन्यांचे जुने रेकॉर्डही तपासले. ज्यामध्ये यातील काही कंपन्यांचा ऑफर रद्द करण्याचा इतिहास आहे. तर काही कंपन्यांनी ऑफर लेटरमध्ये दिलेलं पॅकेज कमी केलं.