40 कुमारीका एका मेसेजमुळे झाल्या गर्भवती, PM मोदींच्या मतदारसंघात खळबळ! काय आहे प्रकरण?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदासंघातील एक अजब प्रकरण उघड झालं आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयानं एका गावातील 40 कुमारीकांना गर्भवती जाहीर केलं. त्यांना मंत्रलयानं तसा अधिकृत मेसेजही पाठवला. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही आता लाभ घेऊ शकता, असं जाहीर करण्यात आलं. एकाच वेळी गावातील इतक्या कुमारीकांना मेसेज आल्यानं एकच खळबळ उडाली. या मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर यामगील सत्य उघड झालं.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. याच मतदारघात अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचं एक उदाहरण समोर आलंय. यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये 40 कुमारीकांना गर्भवती असल्याचं जाहीर करण्यात आलं. वाराणसीमधील मलहिया गावातील ही घटना आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सर्वांना आलेल्या मेसेजमध्ये लिहलं होतं, 'अभिनंदन! तुमची मुल पोषण ट्रॅकरमध्ये यशस्वीपणे नोंदणी झाली आहे. तुम्ही होम व्हिजट माध्यमातून स्तनपानाबाबतचे प्रश्न, आरोग्यसेवा आणि लसीकरणासारख्या गोष्टींचा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून फायदा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी  14408 नंबरवर कॉल करा, महिला आणि बाल विकास मंत्रालय'

गावात खळबळ 

या गावाचे ग्राम प्रधान अमित पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मोबाईलमधील हा मेसेज पाहून या मुली तसंच त्यांच्या कुटुंबीयाना मोठा धक्का बसला. त्यांनी ग्राम प्रधानच्या माध्यमातून मुख्य विकास अधिकाऱ्यांकडं (CDO) तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा मेसेज 40 मुलींना पाठवण्यात आल्याचं या चौकशीत उघड झालं. 

Advertisement

( नक्की वाचा :  काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये अडकले होते 2 ट्रेकर्स, वाचा कशी झाली सुटका? )

वाराणसीचे CDO हिमांशू नागपाल यांनी या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असल्याचं सांगितलं. हे प्रकरण मानवी चूक असल्याचं सांगत प्रशासनानं कर्मचाऱ्यांना नोटीस दिलं. आत्तापर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई झालेली नाही. 
 

Advertisement
Topics mentioned in this article