कार कालव्यात कोसळून अपघात, दसऱ्याच्या दिवशी एकाचा कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

Haryana Accident : दसऱ्यानिमित्त आयोजित बाबा राजपुरी जत्रेला हे सर्वजण जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत चालक बचावला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 

जाहिरात
Read Time: 1 min

हरियाणातील कैथलमध्ये दसऱ्याच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव कार कालव्यात पडल्याने एकाच आठ जणांना मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. एकूण 9 जण कारमधून प्रवास करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

दसऱ्यानिमित्त आयोजित बाबा राजपुरी जत्रेला हे सर्वजण जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत चालक बचावला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 

मृतांमध्ये सतविंदर (50 वर्ष), चमेली (65 वर्ष), तीजो (45 वर्ष), फिजा (16 वर्ष), वंदना (10 वर्ष), रिया (10 वर्ष), कोमल (12 वर्ष) आणि रमणदीप (6 वर्ष) यांचा समावेश आहे. घरातील सर्व सदस्य जत्रा पाहण्यासाठी जात होते.

कैथलमधील या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Topics mentioned in this article