8th Pay Commission Salary Calculator: केंद्रीय कर्मचाऱ्यांचं गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीवर लक्ष होतं तो निर्णय अखेर झाला आहे. मोदी सरकारनं 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाला (8th Central Pay Commission) मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून, तर आयआयएम बंगळूरचे प्राध्यापक पुलक घोष आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग 18 महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करणार आहे.
या आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. ब्रोकरेज कंपन्या आणि आर्थिक तज्ज्ञांनी संभाव्य फिटमेंट फॅक्टर आणि त्यावर आधारित वेतन वाढीचे आकडे (Salary Hike Calculation) काही दिवसांपूर्वी जाहीर केले होत. 'अॅम्बिट कॅपिटल' (Ambit Capital) आणि 'कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज' (Kotak Institutional Equities) यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालानुसार, कर्मचाऱ्यांच्या प्रभावी वेतनात 13% ते 34% पर्यंत वाढ होऊ शकते.
किती होणार पगार वाढ?
वेतन सुधारणेसाठी वापरण्यात येणारा फिटमेंट फॅक्टर किती असेल, यावर वेतनात होणारी वाढ अवलंबून असते. 'अॅम्बिट कॅपिटल'च्या अहवालानुसार, हा फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो.
बेस केस (Base Case): जर फिटमेंट फॅक्टर 1.83 राहिला, तर प्रभावी वेतनात 14% वाढ होऊ शकते.
मीडियन केस (Median Case): फिटमेंट फॅक्टर 2.15 असल्यास, वेतनात 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
अप्पर केस (Upper Case): जर फिटमेंट फॅक्टर 2.46 ची शिफारस झाली, तर वेतनात तब्बल 54% ची मोठी वाढ दिसू शकते.
दुसरीकडे, 'कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज'ने त्यांच्या 21 जुलैच्या अहवालात फिटमेंट फॅक्टर 1.8 असण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे वेतनात 13% ची वाढ अपेक्षित आहे.
( नक्की वाचा : Big Breaking! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8th Pay Commission मंजूर, 'या' तारखेपासून लागू होणार? )
वेतन वाढ कशी मोजतात? फिटमेंट फॅक्टरचा अर्थ काय?
फिटमेंट फॅक्टरचा अर्थ असा आहे की, सध्याच्या 'मूळ' वेतनाला (Basic Pay) त्या फॅक्टरने गुणले जाते. उदाहरणार्थ, जर फिटमेंट फॅक्टर 1.8 असेल, तर तुमचे मूळ वेतन 1.8 ने गुणले जाईल.
मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता (DA) 'शून्य' (Zero) होतो, त्यामुळे प्रभावी वेतन वाढीत थोडी कपात होते.
मूळ वेतन 50,000 हजार रुपये असल्यास किती वाढ होणार?
सध्या ज्या सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50,000 रुपये आहे, त्याच्या वेतनात 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर किती वाढ होऊ शकते, याचे दोन संभाव्य हिशेब खालीलप्रमाणे आहेत
सध्याचे एकूण वेतन (अंदाजे):
मूळ वेतन: 50,000 रुपये
HRA (24% दराने): 12,000 रुपये
TA: 2,160 रुपये
DA (55% दराने): 27,500 रुपये
सध्याचे एकूण वेतन: 91,660 रुपये
(टीप: हा DA 55% वर मोजला आहे, जो केवळ उदाहरणासाठी आहे.)
1.82 फिटमेंट फॅक्टरनुसार वाढ
नवीन मूळ वेतन - 50,000 गुणिले 1.82 ) - 91,000 रुपये
नवीन HRA (91,000 गुणिले 24 % ) - 21,840 रुपये
TA: 2,160 रुपये
नवीन DA: 0 रुपये
नवीन एकूण वेतन: 1,15,000 रुपये
वाढ: सुमारे 25.46%
2.15 फिटमेंट फॅक्टरनुसार वाढ:
नवीन मूळ वेतन (50,000 गुणिले 2.15 ) - 1,07,500 रुपये
नवीन HRA : (1,07,500 गुणिले 24 % ) - 25,800 रुपये
नवीन TA: 2,160 रुपये
नवीन DA: 0 रुपये
नवीन एकूण वेतन: 1,35,460 रुपये
वाढ: सुमारे 47.78%
महत्त्वाची सूचना: वरील सर्व आकडेमोड केवळ अंदाजे (Estimates) आहे. 8वा वेतन आयोग सर्व संबंधितांशी चर्चा करून जो 'वास्तविक फिटमेंट फॅक्टर' (Actual Fitment Factor) निश्चित करेल, त्यानुसार अंतिम वेतन वाढ होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world