Satish Shah Net Worth: भारतीय थिएटर आणि बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता सतीश शाह यांचं शनिवारी निधन झालं. सतीश शाह भारतीय अभिनय क्षेत्रातील असं नाव आहे जे ह्यूमर आणि प्रामाणिक अभिनयासाठी ओळखलं जातं. विनोदी भूमिका आणि दर्जेदार अभिनयासाठी आजही त्यांची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. साराभाई वर्सेस साराभाई पासून मै हू नापर्यंत त्यांनी स्मरणात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अनुभवाचा कॅनव्हास स्टेज, टीव्ही आणि चित्रपटांपर्यंत पसरलेला आहे.
सतीश शाह यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते एका चित्रपटासाठी २ ते ५ कोटींपर्यंत फी घेत होते अशी माहिती आहे. त्यांची योग्य नेटवर्थ सार्वजनिकपणे माहिती नाही. मात्र विविध मीडियावर आलेल्या वृत्तांनुसार, ते चित्रपट आणि टीव्ही शो मधून चांगली कमाई करीत होते आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करीत होते. याशिवाय समाजसेवा, चॅरिटीमध्येही ते सक्रिय होते.
२०२५ मध्ये सतीश शाह यांच्या नेटवर्थचा अंदाज
सतीश शाह यांच्या संपत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. ते आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक बाबी कायम प्रायव्हेट ठेवत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना एका चित्रपटासाठी २ ते ५ कोटींपर्यंत फी मिळत होती. याशिवाय चित्रपट, टीव्ही आणि ब्रँड असोसिएशनमध्ये सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे निधनापर्यंत त्यांची एकूण संपत्ती ४० ते ४५ कोटींच्या घरात असेल. टीव्ही शो आणि स्टेजवरील कार्यक्रमांमधूनही त्यांची चांगली कमाई होत होती. मुंबई आणि भारतातील इतर भागातही त्यांच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. याशिवाय यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
थिएटर ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास...
सतीश शाह यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात गुजराती थिएटरमधून केली होती. त्यांनी प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांसह अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि आपली ओळख निर्माण केली. १९८४ मध्ये ये जो है जिंदगी नावाच्या टीव्ही मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली आणि त्यांना विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम साथ साथ है, फिल भी दिल है हिंदुस्तानी, मै हू ना सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिकेने प्रभाव टाकला.
सतीश शाह यांची संपत्ती कोटींमध्ये असली तरी त्यांची खरी संपत्ती त्यांचं काम, विनम्रता आणि समाजाप्रती त्यांचं समर्पण आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात जिवंत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world