रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Supreme Court Viral News Today : नेहमीप्रमाणे आज सुप्रीम कोर्टात सुनावणीचा दिवस होता. परंतु, कोणाच्याही ध्यानी मनी नसेल अशी घटना आज कोर्टात पाहायला मिळाली. सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. लखनऊचे एक प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीला आले आणि मोठा गदारोळ निर्माण झाला. युक्तीवाद करण्यासाठी उभे असलेल्या प्रबल प्रताप नावाच्या वकीलाने अचानकपणे थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडे फाईल भिरकावली आणि त्यांना अपशब्द वापरले. कोर्टातील या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
याचिकाकर्ते आणि ॲड प्रबल प्रताप यांची एका पोलिसाविरोधातील याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली. त्यानंतर प्रबल प्रताप सुप्रीम कोर्टात आले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हे प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीसाठी आले. ॲड प्रबल प्रताप यांनी युक्तीवाद सुरू करतानाचा सुप्रीम कोर्टाला आदेश दिला.
प्रबल प्रताप कोर्टाला म्हणाले, “मी तुम्हाला ॲार्डर देतो की, लखनऊच्या एसीपी विरोधात एफआयआर दाखल करा.” त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सवाल उपस्थित करत त्या वकिलांना विचारंल की, “तुम्ही मला आदेश देत आहात का?, त्यानंतर प्रताप यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना शिवीगाळ केली आणि एका फाईल मधील कागदपत्रे चीफ जस्टीस यांच्या दिशेने फेकून दिली. त्यावेळी न्यायाधीशांसह कोर्टातील सर्वांना धक्का बसला.
फाईल न्यायाधीशांकडे फेकली अन् नंतर घडलं..
“माझ्याकडून फक्त एवढचं आहे”असं म्हणत ॲड प्रबल प्रताप यांनी फाईल न्यायाधीशांकडे फेकली आणि अपशब्द वापरले. त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी वकीला प्रताप यांना पकडलं आणि कोर्टाच्या बाहेर नेलं. मात्र त्यावेळी चीफ जस्टीस कोर्टात उपस्थित नव्हते. ही घटना न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली. याचिकाकर्त्याच्या अपमानास्पद वागणुकीनंतर काही काळ न्यायालयात शांतता पसरली होती.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी संबंधीत वकिलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोर्ट म्हणाले की “याचिकाकर्ता त्रासलेले आहेत. हतबल आहेत. सहानुभूतीनं त्यांच्याकडे पाहायला पाहीजे. कोर्ट त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. शिवाय त्यांच्या प्रकरणात कोर्टाने दखल द्यावी, असं काही नाही.” अलाहाबाद हायकोर्टात प्रबल प्रताप यांची रिट याचिका फेटाळली त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात आले होते.