Aadhaar card on WhatsApp: आता व्हॉटसअपवरच मिळेल आधार कार्ड, जाणून घ्या सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप

अनेक ठिकाणी आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Aadhaar Card Download via WhatsApp: आधार कार्ड हे आजच्या काळात एक महत्वाचा दस्तावेज बनला आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. बँक खात्यापासून ते सरकारी कामांपर्यंत, अनेक ठिकाणी आधार कार्डची गरज भासते. मात्र, अनेकदा आधार कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास काय करावे, हा प्रश्न अनेकांना सतावतो. यावर आता एक उत्तम तोडगा निघाला आहे! आता तुम्ही UIDAI पोर्टल किंवा डिजीलॉकर ॲपची वाट न पाहता, थेट तुमच्या व्हॉट्सॲपवरून आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. (Aadhaar on WhatsApp) आणि ते देखील अवघ्या काही सेकंदांमध्ये, कसं ते जाणून घेऊयात. 

नक्की वाचा: 'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती

या नवीन सुविधेमुळे, तुम्हाला व्हॉटसअपवरच आधार कार्ड डाऊनलोड करता येईल. इतकंच नाही तर या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरच आधार कार्डासह इतर महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळवू शकाल. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया वेगवान आणि सोपी आहे.  

व्हॉट्सॲपवरून आधार कार्ड कसं डाऊनलोड करायचे? 

  • सर्वात आधी, तुमच्या फोनमध्ये MyGov Helpdesk चा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक +91-9013151515 'MyGov Helpdesk' या नावाने सेव्ह करा. 
  • त्यानंतर व्हॉट्सॲप उघडून या नंबरवर 'Hi' किंवा 'Namaste' असा संदेश पाठवा. 
  • चॅटबॉट सक्रिय झाल्यावर तुम्हाला 'DigiLocker Services' चा पर्याय दिसेल, तो निवडा. 
  • चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुमचे डिजीलॉकर खाते आहे का. 
  • जर नसेल, तर तुम्ही UIDAI च्या संकेतस्थळावर किंवा ॲपवर जाऊन ते तयार करू शकता. 
  • त्यानंतर तुमचा 12-अंकी आधार क्रमांक चॅटमध्ये टाइप करा. 
  • तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) येईल, तो ओटीपी टाका. 
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर, तुमच्या डिजीलॉकर खात्यातील सर्व कागदपत्रांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. 
  • यातील 'आधार कार्ड' या पर्यायाचा क्रमांक निवडा. 
  • काही क्षणांतच, तुमचे आधार कार्ड PDF फॉरमॅटमध्ये तुमच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये मिळेल जे तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

नक्की वाचा: iPhone 17 मार्केट जाम करणार; दमदार फीचर्ससह नवी सीरिज लॉन्च, वाचा किंमत

आता वेगळ्या ॲपची गरज नाही

या नवीन सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यासाठी कोणतेही अतिरिक्त ॲप लागत नाही. ही सेवा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे ही सेवा MyGov Helpdesk द्वारे दिली जात असल्याने ती सुरक्षित आहे. ज्या लोकांना UIDAI पोर्टल किंवा अन्य ॲप्स वापरणे थोडे कठीण वाटते, त्यांच्यासाठी ही सुविधा खूपच फायदेशीर ठरेल.