जाहिरात

Apple Event 2025: iPhone 17 मार्केट जाम करणार; दमदार फीचर्ससह नवी सीरिज लॉन्च, वाचा किंमत

iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंच आणि 17 Pro Max मध्ये 6.9 इंच Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून, त्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्सपर्यंत आहे.

Apple Event 2025: iPhone 17 मार्केट जाम करणार; दमदार फीचर्ससह नवी सीरिज लॉन्च, वाचा किंमत
iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max लॉन्च

iPhone 17 New Phones: ॲपलने भारतासह जागतिक बाजारात iPhone 17 सीरीज लाँच केली आहे. या नवीन लाइनअपमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यातील सर्वात प्रीमियम मॉडेल्स असलेल्या iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या दोन्ही फोनमध्ये Apple चा सर्वात नवीन आणि टॉप-ऑफ-द-लाइन A19 Pro प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स दमदार झाला आहे.

या दोन्ही फोनचे डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आले आहे. तसेच, या मॉडेल्समध्ये iOS 26 ऑपरेटिंग सिस्टम आणि अत्याधुनिक Apple Intelligence फीचर्स देण्यात आले आहेत.

iPhone 17 ची किंमत किती ?

  1. iPhone 17 Pro, 256GB-  1,34,900 रुपये आहे.
  2. iPhone 17 Pro, 512GB - 1,54,900 रुपये
  3. iPhone 17 Pro,  512GB 1TB - 1,74,900 रुपये आहे.

iPhone 17 Pro Max ची किंमत किती ?

  1. iPhone 17 Pro Max, 256GB- 1,49,900 रुपये
  2.  iPhone 17 Pro Max 512GB- 1,69,900
  3. iPhone 17 Pro Max 1TB- 1,89,900
  4. iPhone 17 Pro Max 2TB- 2,29,900 

या दोन्ही आयफोनची प्री-ऑर्डर 12 सप्टेंबर रोजी दुपारी 5.30 वाजल्यापासून सुरू होणार असून, त्यांची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. हे फोन सिल्वर, डीप ब्लू आणि कॉस्मिक ऑरेंज या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

(नक्की वाचा-  What is Digital Detox : डिजिटल डिटॉक्स काय आहे? प्रत्येकाने अवलंब करणं का आहे गरजेचं?)

iPhone 17 फीचर्स (iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max Specifications)

  • iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंच आणि 17 Pro Max मध्ये 6.9 इंच Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून, त्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्सपर्यंत आहे.
  • दोन्ही मॉडेल्समध्ये A19 Pro प्रोसेसर असून, ते iOS 26 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.
  • Apple Intelligence फीचर्समुळे व्हिज्युअल इंटेलिजन्स, लाइव्ह ट्रान्सलेशन आणि क्लीन अप यांसारख्या सुविधा मिळतात.
  • 3x जास्त स्क्रॅच रेसिस्टन्ससाठी फ्रंटवर सेरामिक शील्ड 2 आणि चांगल्या हीट डिसिपेशनसाठी फोर्ज्ड ॲल्युमिनियम यूनिबॉडी वापरण्यात आली आहे.

कॅमेरा कसा असेल?

  • दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
  • यात ƒ/1.78 अपर्चरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा, ƒ/2.2 अपर्चरसह 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ƒ/2.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 18 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

(नक्की वाचा - Online shopping: ऑनलाइन मोबाईल मागवला पण मिळाले दगड- विटा, अशा वेळी कुठे तक्रार कराल? जाणून घ्या सर्व माहिती)

बॅटरी

बॅटरीची क्षमता जाहीर करण्यात आली नसली तरी, 17 Pro मध्ये 31 तास आणि 17 Pro Max मध्ये 37 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक मिळतो. विशेष म्हणजे, 17 Pro Max ची बॅटरी लाइफ iPhone 15 Pro Max पेक्षा 3 तास जास्त आहे. फक्त 20 मिनिटांत बॅटरी 50 टक्के चार्ज होते. यात यूएसबी 3.0 टाइप-सी पोर्ट, 5G, वाय-फाय 7, ई-सिम सपोर्ट आणि ब्लूटूथ 6 यांसारखे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com