Nitish Kumar Viral Video : अभिनेत्री जायरा वसीमने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. नितीश कुमार एका व्हिडिओमध्ये सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब खेचताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अभिनेत्री जायरा वसीमने नितीश कुमार यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. तिने नितीश कुमार यांच्याकडे बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे.
जायराने सोमवारी १५ डिसेंबरला रात्री एक्सवर लिहिलं, एका महिलेची गरिमा आणि इज्जन खेळणं नाही. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी महिलेच्या इज्जतीशी खेळणं योग्य नाही. एक मुस्लीम महिला म्हणून हा व्हिडिओ पाहणं संताप वाढवणारं आहे.
तिने पुढे लिहिलंय, सत्ता तुम्हाला मर्यादा पार करण्याची परवानगी देत नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागायला हवी.
अचानक असं काही घडलं की महिलाही हैराण
नितीश कुमार यांच्याकडे अपॉइंटमेंट लेटर घेत असताना पाटन्यात नव्याने रुजू झालेली आयुष डॉक्टरच्या चेहऱ्यावरील हिजाब हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर तीदेखील हैराण झाली. या घटनेचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सीएम सचिवालयाच्या संवादमध्ये घडली, येथे एक हजारांहून अधिक आयुष डॉक्टरांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात येत होतं.