मुंबई : अदाणी इलेक्ट्रिसिटीला अमेरिकेतील ब्रँडन हॉल एच आर एक्सलन्स गोल्ड अवॉर्ड 2024 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांना जागतिक मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. कंपनीला त्यांच्या प्रमुख अदाणी मार्व्हल्स (ए मार्व्हल्स) लीडरशिप उपक्रमासाठी बेस्ट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम गटात हा पुरस्कार मिळाला. त्यायोगे कर्मचाऱ्यांचा सतत विकास करण्याच्या आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या कंपनीच्या निर्धाराला मान्यता मिळाल्याचे दाखवून दिले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी एक वर्षाचा 'ए मार्व्हल्स' हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्याद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काळातील नेतृत्वगुणांसाठी कौशल्य आणि दूरदृष्टी विकसित केले जातात. यात वेगवेगळे शिकवणी वर्ग, वैयक्तिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांच्या साह्याने योग्य नेतृत्वगुण तयार केले जातात.
या क्षेत्रातील नवकल्पना, आराखडा, कल्पकता, तंत्रज्ञानाचा वापर तसेच त्याचे दिसणारे फलित आणि कर्मचाऱ्यांचा फायदा जाणून घेण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेली मते, या आधारे या पुरस्कारासाठी मूल्यमापन केले जाते. अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या या कार्यक्रमामुळे त्यांच्या उत्पादकतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होण्यावर चांगला परिणाम झाल्याचे आढळून आले.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणारे नेतृत्व:
अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये झालेल्या ब्रॅंडन हॉल एक्सलन्स कॉन्फरन्स दरम्यान अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. चे मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी डॉ. संजीव मुरमकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणावर आम्ही देत असलेला भर, या पुरस्काराद्वारे अधोरेखित झाला आहे, असे ते पुरस्कार स्वीकारताना म्हणाले. आमच्या मनुष्यबळाच्या विकासासाठी गुंतवणूक करणे हे आमच्या यशासाठी महत्त्वाचे असल्यावर आमचा विश्वास आहे. त्यानुसार त्यांना भविष्यातील आव्हानांना सहज तोंड देता यावे आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करतात याव्यात यासाठी त्यांना आवश्यक ते ज्ञान आणि संसाधने देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले.
Beed News: 26 अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड कनेक्शन, तृप्ती देसाईंनी पुरावेच दिले; त्या पेनड्राईव्हमध्ये काय काय?
हा पुरस्कार मिळाल्याने मनुष्यबळाच्या भांडवलाचा विकास करण्यातील व संस्थात्मक विकास आणि व्यवस्थापन कौशल्यात नवे मापदंड निर्माण करण्यातील अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ब्रॅंडन हॉल ग्रुप ही जगातील आघाडीची संशोधन आणि विश्लेषण करणारी संस्था असून ती गेली तीस वर्षे जगातील दहा हजार कंपन्या व संस्थांना सेवा देते. ब्रॅंडन हॉल एच आर एक्सलन्स या पुरस्कारांना मनुष्यबळ भांडवल व्यवस्थापनाचे अकादमी पुरस्कार असे म्हटले जाते. मनुष्यबळाचा विकास, व्यवस्थापन कौशल्य आणि बुद्धिमत्ता तसेच संस्थात्मक शिक्षण यात योगदान देणारे व नवकल्पना दर्शवणारे उपक्रम आणि तंत्रज्ञान यांना त्याद्वारे मान्यता दिली जाते.