शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपले नाव कोरणाऱ्या लखनऊ येथील ‘अदाणी जेम्स स्कूल ऑफ एक्सलन्स'ला देशातील सर्वोत्तम शाळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. ‘Cfore' या बहु-शिस्त संशोधन संस्थेने केलेल्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणानुसार , या शाळेला भारतातील तिसरी सर्वोत्तम उदयोन्मुख शाळा (Emerging School) म्हणून आणि लखनऊमध्ये पहिल्या क्रमांकाची सर्वोत्तम शाळा म्हणून गौरवण्यात आले आहे. केवळ एका वर्षाच्या कालावधीत या शाळेने ही कामगिरी करत बहुमान मिळवला आहे.
नक्की वाचा: दातृत्वासोबत एकत्रित उभारणीसही हातभार लावा! डॉ.प्रीती अदाणी यांचे आवाहन
10 सप्टेंबर रोजी होणार गौरव
‘Cfore' ने पालकांकडून, शिक्षकांकडून, प्राचार्यांकडून, शिक्षणतज्ज्ञांकडून आणि विद्यार्थ्यांकडून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण केले आहे. एकूण 14 शैक्षणिक उत्कृष्टतेच्या मानकांवर शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. यात शिक्षण पद्धती, पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी विकास यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. या मानकांवर ‘अदाणी जेम्स स्कूल ऑफ एक्सलन्स'ने उत्कृष्ट कामगिरी करून हे मानांकन मिळवले आहे. 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, जिथे देशातील अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थांचा गौरव केला जाईल.
प्रीती अदाणी यांनी व्यक्त केले समाधान
या यशाबद्दल बोलताना ‘अदाणी जेम्स एज्युकेशन'च्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी आपले समाधान व्यक्त केले. शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन, सामाजिक जबाबदारी स्वीकारणाऱ्या, आत्मविश्वासू आणि संवेदनशील व्यक्ती घडवते. या सन्मानामुळे ही बाब ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे प्रीती अदाणी यांनी म्हटले. लखनऊमधील पहिल्या क्रमांकाची आणि देशातील तिसरी सर्वोत्तम शाळा म्हणून गौरव होणे हा मोठा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले.
नक्की वाचा: आता इमर्जन्सीमध्ये रक्तासाठी धावाधाव करावी लागणार नाही, 'संजीवनी' अॅप दूर करेल सगळा मनस्ताप
शाळेच्या सुरुवातीपासूनच ‘अदाणी जेम्स स्कूल ऑफ एक्सलन्स'ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. या शाळेमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. ‘अदाणी ग्रुप' आणि ‘जेम्स एज्युकेशन' यांच्या संयुक्त उपक्रमातून ही शाळा चालवली जाते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता एक चांगली व्यक्ती आणि जगाच्या पातळीवर आपली ठळक ओळख निर्माण करण्याची विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करता यावी यासाठी सक्षम बनविण्याचा या शाळेद्वारे प्रयत्न केला जातो.