
हाँगकाँगमध्ये झालेल्या AVPN ग्लोबल कॉन्फरन्समध्ये डॉ. प्रीती अदाणी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये परोपकाराची पारंपारिक संकल्पना बदलण्याचे आवाहन करताना म्हटले की आता केवळ दातृत्वाने भागणार नसून एकत्रितपणे काम करणेही गरजेचे झाले आहे. यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. "केवळ पैसे देऊ नका, तर एकत्र येऊन उभारणी करा," असे सांगत त्यांनी सामाजिक कार्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाजात मोठा बदल घडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे, असे मत प्रीती अदाणी यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा: अदाणी इलेक्ट्रिसिटीनं मुंबईत गणेशोत्सव अन् माऊंट मेरी जत्रेसाठी 2,571 हून अधिक फ्लडलाईट्सची केली सोय
डॉ. अदाणी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सामाजिक कार्य किती प्रभावी ठरले हे आकडेवारीतून कळणे मुश्कील असते. मात्र त्या कार्याचा प्रभाव किती झाला आहे हे त्यामागे दडलेल्या अगणित मानवी कथांमध्ये असतो. या मानवी कथा आशा, परिवर्तन आणि सक्षमीकरणाच्या कथा असतात. डॉ.प्रीती अदाणी यांनी या मानवी कथांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, जेव्हा आपण सर्वजण एकाच व्यासपीठावर एकत्र येतो, तेव्हाच कामाचा परिणाम अनेक पटींनी वाढतो.
डॉ. अदाणी यांनी त्यांच्या भाषणात तीन महत्त्वाच्या बाबी मांडल्या
- एकत्र काम करा: प्रत्येक भागीदाराने केवळ देणगी देऊन थांबू नये त्यांनी तर शाश्वत बदल घडवण्यासाठी एकत्र काम करायला हवे.
- अधिक प्रयत्न व्हावे: एखाद्याला मदत मिळते आणि ती मदत मिळालेली व्यक्ती इतरांना मदतीसाठी पुढे सरसावते तेव्हा खऱ्या अर्थाने बदल घडण्यास सुरूवात होते. अशा व्यक्ती सकारात्मक बदल घडवण्याचे माध्यम बनतात.
- कौशल्ये आणि मूल्यांची सांगड: डॉ. अदाणी यांच्या मते, मूल्यांशिवाय दिलेली कौशल्ये ही पायाभरणीशिवाय उभ्या केलेल्या इमारतीसारखी आहेत. त्यामुळे, सामाजिक कार्यात कौशल्ये आणि मूल्ये यांचा मिलाफ होणे अत्यंत गरजेचे आहे.
नक्की वाचा: शिकता शिकता कमवा! अदाणी समूहाने केली ‘कर्म शिक्षा'ची घोषणा
डॉ. प्रीती अदाणी यांनी म्हटले की, परोपकाराची खरी ताकद ही वेगळ्या-वेगळ्या योगदानात नसून, ती एकत्रितपणे प्रयत्न करण्यामध्ये आहे.“आपण केवळ देणगीदार नव्हे, तर सह-निर्माते बनले पाहिजे,” असे सांगत त्यांनी संसाधने एकत्र करून काम करण्यावर भर दिला. त्यांच्या मते, जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा प्रत्येक रुपयाचा अधिक प्रभावीपणे उपयोग होतो आणि प्रत्येक उपाय अधिक वेगाने अंमलात येतो. डॉ. अदाणी यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी केवळ चर्चा न करता कृतीशील होण्याची गरज आहे. यासाठी विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. याचून चांगल्या गोष्टी आत्मसात करणे सोपे होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world