अदाणी समुहाची बिहारमध्ये मोठी गुंतवणूक; अंबुजा सिमेंट 1600 कोटींचा प्रकल्प उभारणार

Ambuja Cement : बिहार औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरण (BIADA) ने सिमेंट युनिटसाठी 67.9 एकर जमीन दिली आहे. ज्यासाठी कंपनीला पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. हे युनिट डिसेंबर 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अदाणी समूहाचा भाग असलेली अंबुजा सिमेंट लिमिटेड बिहारमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. अंबुजा सिमेंट बिहारमध्ये सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारणार आहे. या प्रकल्पाचं भूमीपूजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर (अॅग्रो, ऑईल अँड गॅस) आणि अदाणी एंटरप्राइजेज लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी हे देखील उपस्थित होते. यामध्ये अंबुजा सिमेंट तब्बल 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

अंबुजा सिमेंट लिमिडेटचा हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये उभारला जाणार आहे.  पहिल्या टप्प्यात 2.4 एमटीपीएचा प्रकल्प असेल ज्यात जवळपास 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत पहिल्या टप्प्यातील प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

कंपनीच्या भविष्यातील विस्तारासाठी जमिनीची पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प बिहारमधील नवादा जिल्ह्यातील वारिसलिगंज तालुक्यातील मोसामा गावात आहे. प्रकल्प रस्ते आणि रेल्वे मार्गाशी जोडलेला आहे.  वारिसलिजंग रेल्वे स्टेशन अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे, तर राज्य महामार्ग 83 अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. 

Advertisement

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भूमीपूजन सोहळ्यामध्ये म्हटलं की,"अदाणी समूहाची ही गुंतवणूक बिहार राज्याच्या विकासाचा पुरावा आहे आणि बिहारच्या लोकांसाठी शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आमची वचनबद्धता आहे."

मॅनेजिंग डायरेक्टर (अॅग्रो, ऑईल अँड गॅस) आणि अदाणी एंटरप्राइजेज लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी यांनी म्हटलं की, "ही गुंतवणूक राज्य सरकारशी विकासकामे आणि आमच्या व्यावसायिक वृद्धीच्या योजना अधोरेखित करते. सिमेंट उद्योग सरकारच्या पायाभूत सुविधांच्या योजनांमुळे सुस्थितीत आहे. अंबुजा सिमेंट्स देशातील शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाला समर्थन देण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. या आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत आम्ही राज्य सरकार, अधिकारी आणि स्थानिकांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. सरकारचे समर्थन आणि सर्व परवानग्यांमुळे ही ऐतिहासिक गुंतवणूक अल्पावधीतच शक्य झाली आहे."

Advertisement

बिहार औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरण (BIADA) ने सिमेंट युनिटसाठी 67.9 एकर जमीन दिली आहे. ज्यासाठी कंपनीला पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. हे युनिट डिसेंबर 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. BIADA ने महाबळ, मोतीपूर, मुझफ्फरपूर या औद्योगिक क्षेत्रातील दुसऱ्या सिमेंट युनिटसाठी 26.6 एकर जमीन Amubja Cements ला दिली आहे. त्यासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रकल्पावर काम सुरू होण्याची शक्यता आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article