गौतम अदाणी यांनी तेलंगणातील विद्यापीठाला दिली 100 कोटींची देणगी, CM ना सोपवला चेक

Gautam Adani : गौतम अदाणी यांनी शुक्रवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 100 कोटींचा चेक सूपूर्त केला. 

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

तेलंगणा सरकार लवकरच यंग इंडिया स्किल विद्यापीठ सुरु करणार आहे. हे विद्यापीठ PPP मॉडलवर चालणार आहे. या विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तयार करण्यावर फोकस केला जाणार आहे. या विद्यापीठाच्या मदतीसाठी अदाणी फाऊंडेशन (Adani Foundation) सरसावलं आहे. अदाणी समुहानं (Adani Group) या विद्यापीठाला 100 कोटींची देणगी दिली आहे. अदाणी समुहाचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani)  यांनी शुक्रवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 100 कोटींचा चेक सूपूर्त केला. 

गौतम अदाणी यांनी यावेळी तेलंगणातील तरुणांचे सशक्तीकरण आणि कौशल्य विकासासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याचं वचन दिलं आहे. 

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितलं, 'महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान 'यंग इंडिया' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरु केलं होतं. त्यापासून प्रेरणा घेत सरकारनं या विद्यापीठाचं नाव यंग इंडिया स्किल यूनिव्हर्सिटी' ठेवलं आहे. हे विद्यापीठ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPP स्वरुपामध्ये चालवलं जाईल. 

या विद्यापीठाच्या माध्यमातून BFSI, फार्मा, बायलॉजी, AI, ई-कॉमर्स या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. मुर्चालामध्ये 50 एकरपेक्षा जास्त परिसरात हे विद्यापीठ उभारलं जाणार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. 

Topics mentioned in this article