Skill Development : शिकता शिकता कमवा! अदाणी समूहाने केली ‘कर्म शिक्षा’ची घोषणा

हा उपक्रम ‘कमवा आणि शिका’ (Earn-while-you-learn) या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच आर्थिकष्ट्या स्वावलंबी होण्याचीही संधी उपलब्ध होईल.  

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समूहाची कौशल्य विकास शाखा असलेल्या अदाणी स्किल्स अँड एज्युकेशनने (ASE) ‘कर्म शिक्षा'  नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. हा एक अनोखा वर्क-स्टडी डिप्लोमा कार्यक्रम असून, ‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद' (NCVET) अंतर्गत याला मान्यता मिळाली आहे. या उपक्रमातून १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या तसेच आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख आणि उद्योग-आधारित शिक्षण दिले जाणार आहे.

शिक्षण घेतानाच कमाईची संधी

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षणच नव्हे, तर अदाणी समूहाच्या मुख्य क्षेत्रांमध्ये, जसे की बंदरे, ऊर्जा, सौर ऊर्जा उत्पादन, हरित ऊर्जा आणि लॉजिस्टिक्स, प्रत्यक्ष कामाचा अनुभवही देणार आहे. हा उपक्रम ‘कमवा आणि शिका' (Earn-while-you-learn) या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच आर्थिकष्ट्या स्वावलंबी होण्याचीही संधी उपलब्ध होईल.  

नक्की वाचा: भारतात येणाऱ्या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्य काय?

नवी पिढी विकसित भारतासाठी सज्ज होईल!

या उपक्रमाबद्दल बोलताना अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी म्हटले की, “कर्म शिक्षेच्या माध्यमातून आम्ही एक परिवर्तनकारी पाऊल उचलत आहोत. या उपक्रमातून आम्ही तरुणांना केवळ शिक्षणच नाही, तर प्रत्यक्ष कौशल्ये देत आहोत, जी त्यांच्यासाठी संधींचे नवे दरवाजे उघडतील. 'हम करके दिखाते है' या आमच्या तत्त्वज्ञानानुसार आम्ही कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहोत. या उपक्रमाने एक नवी पिढी 'विकसित भारत'च्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम होईल.”

‘कर्म शिक्षा' उपक्रमाची वैशिष्ट्ये

  1. राष्ट्रीय स्तरावर निवड: या उपक्रमासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
  2. दोन वर्षांचा डिप्लोमा: विद्यार्थ्यांना पोर्ट्स मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा वर्क-स्टडी डिप्लोमा दिला जाईल.
  3. राष्ट्रीय स्तरावर मान्यता: हा डिप्लोमा NCVET आणि अदाणी स्किल्स अँड एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित असून, त्याला देशभरात मान्यता मिळाली आहे.
  4. वैविध्यपूर्ण अनुभव: विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांचा अनुभव मिळेल.
  5. आर्थिक सहाय्य: विद्यार्थ्यांना शिक्षण काळात स्टायपेंड दिला जाईल.
  6. उच्च शिक्षणाच्या संधी: हा डिप्लोमा विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांमध्ये थेट प्रवेश मिळवून देईल, ज्यामुळे त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले राहतील.

नक्की वाचा: 30 दिवसांचा महिना 15 दिवस सुट्ट्या; बँका कधी बंद राहणार ? वाचा संपूर्ण यादी

कुशल व्यावसायिकांची मजबूत फळी उभी राहील!

अदाणी स्किल्स अँड एज्युकेशनचे सीईओ रॉबिन भौमिक यांनी सांगितले की, “कर्म शिक्षा हा केवळ एक कोर्स नसून ते भविष्यातील संधींचे प्रवेशद्वार आहे. 'स्किल2एम्प्लॉय' हे आमचे मार्गदर्शक तत्त्व आहे, ज्यामुळे प्रत्येक कौशल्यामुळे रोजगार मिळेल आणि प्रत्येक शिकणारा भारताच्या विकासगाथेमध्ये योगदान देईल. शैक्षणिक अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष कामाचे ज्ञान एकत्र करून, आम्ही भविष्यातील भारतासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल व्यावसायिकांची मजबूत फळी तयार करत आहोत.”

Advertisement