Foreign Travel: परदेशवारी करा फक्त 1000 रूपयात! कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी 'हे' 3 सुंदर देश

खिशात अगदी 1000 रूपये ठेवूनही तुम्ही परदेशात पर्यटन करू शकता. चला तर पाहू हे देश कोणते आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

परदेशवारीचे स्वप्न आता पूर्ण होवू शकतं. कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी तिन देश तुमच्यासाठी  उत्तम पर्याय आहेत.  परदेशात फिरायला जायचे स्वप्न अनेकांचे असते. पण ते सर्वांच्याच प्रत्यक्षात येते असे नाही. प्रवासाचा आणि राहण्याचा मोठा खर्च पाहून अनेकदा हा बेत रद्द होतो. अनेकांना अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या सारख्या देशात फिरायला जायला आवडतं. पण या देशातील चलन हे भारतीय रुपया पेक्षा जास्त मोठं आहे. त्यामुळे या देशात जाणं परवडत नाही. पण हे देश सोडले तर   जगामध्ये असे काही सुंदर देश आहेत, जिथे भारतीय चलनाच्या तुलनेत स्थानिक चलनाची किंमत खूप कमी आहे. यामुळे या देशात जाणे भारतीयंना खूपच परवडणारे आहे. खिशात अगदी 1000 रूपये ठेवूनही तुम्ही परदेशात पर्यटन करू शकता. चला तर पाहू हे देश कोणते आहेत. 

भारतीयांना स्वस्तात परदेशावारी करायची असल्यास त्यातील सर्वात पहिला पर्याय हा नेपाळ आहे.  भारताचा शेजारी देश असलेला नेपाळ हा या यादीत पहिला आहे. नेपाळमध्ये अनेक ऐतिहासिक आणि सुंदर पर्यटनस्थळे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, नेपाळमध्ये भारतीय ₹100 ची किंमत 160 नेपाळी रुपये होते. त्यामुळे हा देश पर्यटनासाठी खूपच स्वस्त ठरतो. भारतीय रुपयांची किंमत इथं जास्त आहे. त्यामुळे कमी पैशात तुम्ही नेपाळमध्ये धम्माल करू शकता. शिवाय तुमच्या परदेशवारीचं स्वप्नही पूर्ण करू शकता. 

नक्की वाचा - Trending News: IAS असलेल्या पत्नीने IAS नवऱ्या विरोधात दाखल केला गंभीर गुन्हा, कारण ऐकून हादरून जाल

नेपाळनंतर कंबोडिय हा देश ही भारतीयांना फिरण्यासाठी चांगला पर्याय आहे.  कंबोडिया हा जगातील एक सुंदर देश असून त्याची संस्कृती पर्यटकांना विशेष आकर्षित करते. ते पाहण्यासाठीच जगभरातील पर्यटक कंबोहियात येत असतात. या देशात भारतीय एका रुपयाची किंमत तब्बल 50 कंबोडियन रियाल इतकी आहे. त्यामुळे अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही कंबोडियाची ट्रीप सहज करू शकता. इथं ही भारतीय रूपया स्ट्राँग आहे. त्यामुळे नेपाळ प्रमाणे इथं ही तुमही कमी पैशांत जास्त फिरू शकता. मौजमजा करू शकता. 

नक्की वाचा - Dharmendra Property: धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कोणाला मिळणार मोठा हिस्सा?

या यादीतील तिसरा देश आहे व्हिएतनाम. पर्यटकांचे केंद्रबिंदू असलेला व्हिएतनाम हा अत्यंत स्वस्त देश आहे. येथे भारतीय एका रुपयाची किंमत तब्बल 300 व्हिएतनामी 'डॉन्ग' एवढी होते. याचा अर्थ तुम्ही अगदी कमी पैशात संपूर्ण व्हिएतनाम फिरू शकता. या देशात राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहे. तुमचे परदेशवारीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्हिएतनाम एक उत्कृष्ट आणि परवडणारा पर्याय आहे. अलीकडच्या काळात व्हिएतनाममध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

Advertisement