एकीकडे भारताने बुधवारी मध्यरात्री दीड वाजता ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पीओके आणि पाकिस्तानमधील ठिकाणांवर मोठा हल्ला केला आहे. नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दुसरीकडे छत्तीसगडच्या वनांचल भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. सैनिकांनी गोळीबार करीत 20 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन दिवसांपूर्वी कर्रेगुट्टाच्या पर्वतावरील चकमकीत जवानांनी एक नक्षलवादी महिलेला संपवलं होतं. सुरक्षा दलांना तिच्या मृतदेहसब 303 रायफल सापडली होती. 12 दिवसांच्या या अभियानात चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये अनेक हत्यारं जप्त करण्यात आली आणि शेकडो नक्षली बंकर नष्ट करण्यात आले आहेत. सध्या नक्षलवाद्यांची तळं जवानांनी घेरलं आहे.
नक्की वाचा - Operation Sindoor : 25 मिनिटं, 21 ठिकाणं; दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणारं ऑपरेशन कसं राबवलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या भागातून 200 हून अधिक आयईडी ताब्यात घेण्यात आले आहेत. करेगु्ट्टाच्या पर्वताजवळील तब्बल पाच हजार फूट उंचीवर सैनिक तैनात आहे. आता नक्षल्यांनी तेलंगणा सीमेवरुन छत्तीसगडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर जवानांना सामना करावा लागेल.
मोठे नक्षलवादी नेत्यांना मारल्याचा दावा...
या अभियानात बडे माओवादी नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांसह शेकडो नक्षली ठिकाण आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.