जाहिरात

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात! वाचा सर्व अपडेट्स

Ahmedabad Plane Crash : गुरुवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर एक प्रवासी विमान कोसळले आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात! वाचा सर्व अपडेट्स
Air India Plane Crash : विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती आहे.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash : गुरुवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर एक प्रवासी विमान कोसळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन जाणारे प्रवासी विमान कोसळले असून, या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

विमान अपघाताबाबत आत्तापर्यंत मिळालेली माहिती

  • विमानतळावर धुराचे मोठे लोट दिसत आहेत.
  • विमानाने टेकऑफ केल्याच्या काही मिनिटांतच ते कोसळले. विमानाने आज दुपारी 1:17 वाजता उड्डाण केले होते.
  • विमानतळाकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
  • अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचाव कार्यासाठी विमानतळावर दाखल झाली असून, आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली आहे.
  • वृत्तसंस्था एएनआय (ANI) नुसार, कोसळलेल्या विमानात किमान 242 प्रवासी होते.

( नक्की वाचा : Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; 242 प्रवासी असल्याची माहिती )

एअर इंडियाचं निवेदन 

या अपघाताबाबत एअर इंडियाने निवेदन जारी केले आहे. आज, 12 जून 2025 रोजी, अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावर जाणारे विमान AI171 एका घटनेत सापडले आहे. सध्या आम्ही या घटनेचे तपशील तपासत आहोत आणि लवकरच पुढील माहिती देऊ," असे एअर इंडियाने म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com